
हा किस्सा रेखा यांनी यासीर उस्मान यांचे लेखन असलेली बायोग्राफी, ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये सांगितला आहे. ‘अंजाना सफर या चित्रपटाचे महबूब स्टुडिओत चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केले. चित्रीकरणाच्यावेळी राजा आणि बिस्वजीत यांनी रेखा यांना न सांगता एक प्लॅन केला होता. बिस्वजीत आणि रेखा यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता. पण जेव्हा राजा यांनी अॅक्शन म्हणताच बिस्वजीत यांनी रेखा यांना मिठीत घेतलं आणि ओठांवर किस केले. रेखा यांना याबाबत जराही कल्पना नव्हती. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही बिस्वजित रेखा यांना किस करत होते. जवळपास ५ मिनिटे हे सुरुच होते. एकीकडे सर्वांना तो सीन आवडला तर दुसरीकडे रेखा यांना रडू कोसळले होते’ असे या प्रसंगाविषयी लिहिण्यात आले आहे.







