३१ जानेवारीपर्यंत बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करा, अन्यथा कडक कारवाई – मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा इशारा

0
42
३१ जानेवारीपर्यंत बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करा, अन्यथा कडक कारवाई – मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा इशारा

फलटण :-  फलटण नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर नळ कनेक्शनधारक नागरिकांनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत स्वतःहून कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे स्पष्ट आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे. दिलेल्या मुदतीत नोंदणी केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुदत संपल्यानंतरही जे नागरिक नळ कनेक्शन नियमित करणार नाहीत, त्यांचे कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही नगरपरिषदेने दिला आहे.
दरम्यान, शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन कायमचे बंद करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी पर्याय म्हणून दोन ते पाच नागरिकांच्या गटासाठी ‘ग्रुप नळ कनेक्शन’ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
फलटण शहरातील नागरिकांना वेळेत व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, हा निर्णय त्याच धोरणाचा भाग आहे. येत्या काही दिवसांत शहरातील सर्व भागांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.