Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रराजमाता जिजाऊ जयंतीदिनी अकलूज नगरपरिषदेला पहिल्या नगराध्यक्षारेश्मा अडगळे यांचा पदभार स्वीकार; शिवतेजसिंह...

राजमाता जिजाऊ जयंतीदिनी अकलूज नगरपरिषदेला पहिल्या नगराध्यक्षारेश्मा अडगळे यांचा पदभार स्वीकार; शिवतेजसिंह मोहिते-पाटील उपनगराध्यक्षपदी बिनविरोध

अकलूज | प्रतिनिधी :- अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा म्हणून रेश्मा अडगळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पावनदिनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. या निमित्ताने अकलूज नगरपरिषदेला पहिल्यांदाच महिला नगराध्यक्षा लाभल्या असून हा क्षण नगरपरिषदेच्या इतिहासात नोंदला गेला आहे.
नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रेश्मा अडगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सयाजीराजे मोहिते-पाटील तर अनुमोदक म्हणून सचिन देशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी निवड प्रक्रिया पूर्ण करत शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची निवड जाहीर केली.
️ पहिल्या निवडणुकीत निर्णायक विजय
अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या उमेदवार रेश्मा अडगळे यांनी तब्बल १२,३१९ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला होता.
या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, क्रांतीसिंह माने-पाटील, युवराज दोरकर, वैशाली भोसले, प्रियंका गायकवाड, सचिन देशमुख, विशाल मोरे, नम्रता जगताप, मोहसीन शेख, मंदाकिनी पाडोळे, रेश्मा तांबोळी, मृदुला सूर्यवंशी, प्रतिभा गायकवाड, मनीषा तिकोटे, नाशिक सोनवणे, शीतल बनपट्टे, विलास क्षीरसागर, नामदेव गलांडे आणि स्वाती फुले हे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत.
तसेच उबाठा शिवसेनेच्या उज्ज्वला विटेकर, भाजपच्या दीपाली वाघमोडे, महेश शिंदे, राहुल लोंढे व जयश्री एकतपुरे, तसेच पृथ्वीराज अंबुरे हेही नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
欄 सामाजिक समतोलासाठी तीन स्वीकृत नगरसेवक
नगरपरिषदेत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खाटीक समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी मिलिंद कडू
जैन समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी योगेश गांधी
मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी अझरुद्दीन शेख
या तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी केली. या निर्णयामुळे नगरपरिषदेत सामाजिक समतोल राखला गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
 सर्वांगीण विकासाचा निर्धार
पदभार स्वीकारताना नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी अकलूज शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. नगरसेवक आणि प्रशासनाच्या समन्वयातून अकलूज शहराचा विकास साधण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments