Thursday, August 13, 2026
Homeक्रीडाRavindra Jadeja Best Allrounder : जडेजाचा गोलंदाजीनंतर बॅटींगमध्येही ‘टॉप क्लास शो’! माजी...

Ravindra Jadeja Best Allrounder : जडेजाचा गोलंदाजीनंतर बॅटींगमध्येही ‘टॉप क्लास शो’! माजी इंग्लिश कर्णधारही झाला चाहता | पुढारी

Ravindra Jadeja Best Allrounder : जडेजाचा गोलंदाजीनंतर बॅटींगमध्येही ‘टॉप क्लास शो’! माजी इंग्लिश कर्णधारही झाला चाहता | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja Best Allrounder : हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना चकवणा-या रवींद्र जडेजाने सामन्याच्या दुस-या दिवशी बॅटनेही कहर केला. त्याने सहाव्या क्रमांकावर येत कसोटी कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने एकापाठोपाठ एक इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याच्या या अप्रतिम खेळीचा माजी इंग्लिश कर्णधारही झाला चाहता आहे. दरम्यान, मायकेल वॉनने जडेजाचे वर्णन जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून केले आहे.

जड्डूचा बॅटने कहर

श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात उतरला. जडेजाने प्रथम केएल राहुलसोबत 65 धावांची भागीदारी केली. राहुल बाद झाल्यानंतर जड्डूने श्रीकर भरतच्या साथीने संघाची धावसंख्या 350 च्या पुढे नेली. दोघांमध्ये 68 धावांची भागिदारी झाली. यादरम्यान जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक पूर्ण केले आणि दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 81 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. या इनिंगमध्ये जड्डूने 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. (Ravindra Jadeja Best Allrounder)

चेंडूनेही चमत्कार

सामन्याच्या पहिल्याच दिवशी जडेजाने अप्रतिम गोलंदाजी केली आणि इंग्लिश संघाचे कंबरडे मोडले. त्याने जो रूट आणि ऑली पोपसारख्या बलाढ्य फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत तीन बळी घेतले. जडेजाशिवाय आर अश्विननेही फिरकीची जादू दाखवली आणि त्यानेही तीन बळी घेतले. तर बुमराहने दोन इंग्लिश फलंदाजांनाही बाद केले.

मायकेल वॉन झाला जड्डूचा चाहता

आधी गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत जडेजाची उत्कृष्ट कामगिरी पाहून माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनही जड्डूचा चाहता झाला आहे. वॉनने जडेजाचे वर्णन जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून केले आहे. त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, ‘तो (जडेजा) सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे.’ (Ravindra Jadeja Best Allrounder)









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments