
पीएमओने म्हटले आहे की, हा एक ‘परिवर्तनकारी’ प्रादेशिक विकास उपक्रम आहे, ज्यामध्ये आंतर-शहरी प्रवासासाठी दर १५ मिनिटांनी हाय-स्पीड ट्रेन उपलब्ध असतील आणि गरजेनुसार, दर पाच मिनिटांनी उपलब्ध केल्या जातील. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एकूण आठ आरआरटीएस कॉरिडॉर असणार आहेत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन कॉरिडॉर दिल्ली-गाझियाबाद-मेरठ, दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अलवर आणि दिल्ली- पानिपतच्या अंमलबजावणीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगण्यात येते. रॅपिड ट्रेनला सुरुवातील ६ बोगी आहेत. प्रवाशी संख्या वाढल्यानंतर यात वाढ करून ९ केली जाणार आहे.









