
सगळे प्रयत्न करून देखील आयेशा खरं सांगत नाहीये हे कळल्यावर आता दीपा कार्तिकच्या मृत्यूचा डाव रचणार आहे. यादरम्यान आता ती इनामदारांच्य घरात मोठा तमाशा करणार आहे. दीपा आयेशाला घराबाहेर निघून जायला सांगणार आहे. मात्र, यावेळी कार्तिक आयेशाच्या बचावासाठी पुढे येण्याचं नाटक करणार आहे. आयेशा या घरातून कुठेही जाणार नाही, असे कार्तिक म्हणणार आहे. तर, मी तुला घटस्फोट देऊन आयेशाशी लग्न करणार, असे देखील तो बोलणार आहे. तर, यावेळी दीपा त्याला जीवे मारण्याची धमकी देणार आहे.








