
Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालीकेच कथानक आहा एक वेगळ्याच ट्रॅकभोवती फिरत आहे. १४ वर्षांपूर्वी झालेला साक्षीचा खून या प्रकरणामुळे आता दीपा इनामदार, कार्तिक आणि आयेशा देशमुख यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. १४ वर्षांपूर्वी साक्षीचा आजार अचानक बळावल्यामुळे कार्तिकला तिची शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र, याच शस्त्रक्रियेदरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. साक्षीचा मृत्यू हा कार्तिकच्या चुकीमुळे झाला असून, तो एक खून होता, हे घाडगे वकिलाने कोर्टात सिद्ध केले. मात्र, त्याच्या या कृत्यामुळे कार्तिकला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला लागली आहे.








