
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘भगवान रामा’च्या, तर साऊथ अभिनेता यश ‘दशानन रावणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही ‘माता सीता’ साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या दमदार अभिनयाने साईने साऊथ सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान, आता पिंकविलाच्या वृत्तानुसार साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.









