Friday, October 2, 2026
Homeसातारासातारा जिल्ह्यातील 133 ग्रा.पं.साठी 5 नोव्हेंबरला धुमशान | पुढारी

सातारा जिल्ह्यातील 133 ग्रा.पं.साठी 5 नोव्हेंबरला धुमशान | पुढारी

[ad_1]








सातारा, पुढारी वृत्तसेवा : जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या 133 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच 200 ग्रामपंचायतींमधील रिक्त 293 सदस्यपदांसाठी व 20 थेट सरपंचपदांसाठीही धुमशान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणार्‍या, नव्याने स्थापित व चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्यपदासह सरपंच) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना/मतदार यादी पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींची 115 इतकी संख्या आहे.

समर्पित आयोगाचा अहवाल दिसत नसल्याने आरक्षण निश्चित करुन दिलेल्या ग्रामपंचायती 17 आहेत. तसेच मुदत संपलेल्या 133 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये 200 ग्रामपंचायतींमध्ये रिक्त राहिलेल्या 293 सदस्यपदासाठी व 20 थेट सरपंचपदाच्या अशा 313 रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दि. 6 रोजी तहसीलदार नोटीस प्रसिध्द करणार आहेत. नामनिर्देशनपत्र दि. 16 रोजीपासून भरता येणार आहेत.

समर्पित आयोगाचा अहवाल दिसत नसल्याने आरक्षण निश्चित करून निवडणूक जाहीर झालेल्या 17 ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्यातील नित्रळ, लुमनेखोल, कोरेगाव तालुक्यातील वेलंग (शिरंबे), चोरगेवाडी, कोंबडवाडी, मुगाव, वाई तालुक्यातील विठ्ठलवाडी, महाबळेश्वर तालुक्यातील मोरणी, जावली तालुक्यातील ओखवडी, तळोशी, भोगवली तर्फ मेढा, केळघर तर्फ सोळशी, गाढवली (पुनर्वसन); फलटण तालुक्यातील सावंतवाडी व जाधवनगर; खटाव तालुक्यातील कामथी तर्फ परळी; कराड तालुक्यातील सावरघर या सर्व ग्रामपंचायतींसह पाटण तालुक्यातील विघटीत केर ग्रामपंचातीसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments