
अयोध्येत आज, 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने अमेरिकेतील वातावरण उत्सवी झाले आहे. तेथे राहणारे सर्व हिंदू भारतीय रामभक्तीत लीन आहेत. या खास निमित्ताने न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर मोठ्या संख्येने भारतीय दिसत आहेत. टाईम्स स्क्वेअरमध्ये सर्व भारतीय आनंदित आहेत, रामाची गाणी गात आहेत. प्रत्येकाच्या हातात रामाचे चित्र असलेले झेंडे आहेत.
अयोध्येत आज, 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने अमेरिकेतील वातावरण उत्सवी झाले आहे. तेथे राहणारे सर्व हिंदू भारतीय रामभक्तीत लीन आहेत. या खास निमित्ताने न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर मोठ्या संख्येने भारतीय दिसत आहेत. टाईम्स स्क्वेअरमध्ये सर्व भारतीय आनंदित आहेत, रामाची गाणी गात आहेत. प्रत्येकाच्या हातात रामाचे चित्र असलेले झेंडे आहेत. (US Indian diaspora celebrate Ram temple pran Pratishtha at New york times square)
टाइम्स स्क्वेअरच्या पडद्यावर रामाची चित्रे लावण्यात आली. अनेकांनी रामाचे चित्र असलेले भगवे झेंडे फडकावले. दरम्यान, ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’च्या सदस्यांनी टाइम्स स्क्वेअरवर लाडू वाटप केले. संस्थेचे सदस्य प्रेम भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम अमेरिकेत मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. जगभरातील लोकांना या कार्यक्रमाशी जोडल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.










