
राम नगरी अयोध्येत गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः जत्रेचे वातावरण आहे. राम मूर्तीच्या स्थापनेपूर्वीच अयोध्येत लोकांची गर्दी होत आहे. आज प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. या खास निमित्ताने नेते, राजकारणी आणि अभिनेते अयोध्येला पोहोचू लागले आहेत. बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स अयोध्येला पोहोचले आहेत. या यादीत आलिया रणबीर, विकी कतरिना, रोहित शेट्टी, जेसी श्रॉफ, अनुपम खेर, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, कंगना रनौत आणि माधुरी दीक्षित यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, अनुपम खेर यांनी एक फोटो शेअर करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. या फोटोमध्ये अनुपम खेर साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत पोज देताना दिसले आहेत. ‘आज खूप दिवसांनी मी माझ्या जुन्या मित्राला, रजनीकांत यांना श्री रामजन्मभूमी येथे भेटलो. जय श्री राम….’ या फोटोमध्ये दोघेही एकत्र हसताना दिसत आहेत. अनुपम खेर आणि रजनीकांत यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.







