
Ayodhya Ram Temple : अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात केली जाणार आहे. तर १६ जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा देखील सुरू होणार आहे. १८ जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. स्थापित होणारी प्रभू श्रीरामाची मूर्ती एकदम खास आहे. ही मूर्ती ५१ इंच उंच, १.५ टन वजनाची आहे. मृतीचे रूप हे निरागस लहान मुलासारखंन आहे. हे रूप अतिशय मोहक, लाघवी, तेजस्वी असे आहे. भगवान रामाची मूर्ती बालस्वरुपात साकारण्यात आली आहे. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे या मूर्तीच्या स्नान घालतील, असे नियोजन मंदिराचा गाभारा बांधतांना करण्यात आले आहे.







