
राम गोपाल वर्मा हे श्रीदेवीचे खूप मोठे चाहते आहेत. खुद्द राम गोपाल यांनी एका पोस्टद्वारे हा किस्सा शेअर केला होता. त्यांची श्रीदेवीची क्रेझ एका सिनेमा हॉलमधून सुरू झाली आणि ही क्रेझ अशी होती की, जेव्हा राम गोपाल वर्मा पहिल्यांदा श्रीदेवीचा तेलुगु चित्रपट पाहून सिनेमा हॉलमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांना वाटले की, ही साधारण व्यक्ती नाही तर एखादी परीच आहे. यानंतर, त्यांनी तिचे आणखी बरेच चित्रपट पाहिले.






