फलटण येथे चायना मांजा विरोधात रॅलीचे आयोजन

0
6
फलटण येथे चायना मांजा विरोधात रॅलीचे आयोजन

फलटण साहस Times : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात आकाश पतंगांनी भरून जात असताना, दुसरीकडे चायना मांजाच्या वापरामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेने चायना मांजाविरोधात धडक मोहिम सुरू केली असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या जनजागृती रॅलीत नागरिकांना चायना मांजामुळे होणाऱ्या जीवघेण्या जखमा, पक्षांचे होणारे मृत्यू, तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक, नैसर्गिक व सुरक्षित मांजा वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

फलटण पोलिस प्रशासन आधीपासूनच चायना मांजावर कारवाई करत असताना, आता नगरपालिका देखील स्वतःहून चायना मांजा वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, चायना मांजाचा वापर आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.