
सुरुवातीला राजपालने काही मालिकांमध्ये केले. त्यानंतर १९९९ सालात आलेल्या अजय देवगणच्या ‘शूल’ या सिनेमातून राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. दोन दशकांच्या कारकीर्दीत राजपालने विविध भूमिका साकारल्या आहेत. हंगामा, गरम मसाला, मुझसे शादी करोगी, मालामाल विकली, भूलभुलैया, पार्टनर, जुडवा-२ अशा अनेक सिनेमांमधून त्याने कॉमेडी भूमिका केल्या आहेत. तर जंगल, डरना मना है, मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू या प्रकराच्या काही सिनेमांमधून त्याने कॉमेडी न करता काहिशा हटके भूमिका साकारल्या आहेत.








