
Rajinikanth Vettaiyan Shooting: सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सरत्या वर्षात त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. लवकरच रजनीकांत त्यांच्या १७०व्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रजनीकांत यांच्या १७०व्या चित्रपटाचे नाव ‘वेट्टियान’ असे ठेवण्यात आले आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. या सेट वरून रजनीकांत आणि फहाद फासिल यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.








