
राजेश खट्टर यांनी ‘नागिन और लुटेरे’ या बॉलिवूड चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर राजेश खट्टर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बिग बजेट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. कवळ बॉलिवूडच नाही तर, राजेश खट्टर यांनी अनेक हॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. यानंतर त्यांनी ‘फिर वही तलाश’ या टीव्ही शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. ‘बेहद’, ‘जुनून’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’, ‘आहट’ आणि ‘विदाई’ सारख्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.









