
जखमींना रुग्णालयात दाखल केले
अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. या गाडीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यास बरेच प्रयत्न करावे लागले. अथक प्रयत्न करून गाडीतील लहान मुले, महिला आणि पुरुषांना बाहेर काढन्यात आले. त्यांना तातडीने येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये एका मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला दुसऱ्या दवाखान्यात पाठवण्यात आले. तसेच एक ३ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.








