
यानंतर राहुल रॉय मनोरंजन विश्वातून एकाएकी बाहेर फेकला गेला. बराच काळ गायब झाल्यानंतर २००७मध्ये जेव्हा ‘बिग बॉस’ हा शो सुरू झाला, तेव्हा सीझन १च्या स्पर्धकांमध्ये राहुल रॉय देखील दिसला. या शोच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा लोकांच्या पसंतीस उतरला आणि शोचा पहिला विजेता देखील ठरला. पण, या शोच्या यशाचाही त्याच्या बुडत्या कारकिर्दीला काही फायदा झाला नाही आणि राहुल पुन्हा गायब झाला. यानंतर राहुलने काही सी-ग्रेड चित्रपटातही काम केले. ‘सपने साजन के’, ‘पहला नशा’, ‘गुमराह’, ‘भूकंप’, ‘हंस्ते-खेलते’, ‘नसीब’, ‘अच्छा फिर कभी’, ‘नॉटी बॉय’ आणि ‘क्राइम पार्टनर’ अशा चित्रपटांमध्ये तो झळकला होता.







