
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. निवडणूक सभांदरम्यान, ‘पनौती’, ‘जेबकतरा’ आणि कर्जमाफीवर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने गुरुवारी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. निवडणूक सभांदरम्यान, ‘पनौती’, ‘जेबकतरा’ आणि कर्जमाफीवर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने गुरुवारी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. निवडणूक आयोगाने त्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत या नोटीसवर उत्तर देण्यास सांगितले आहे.
सत्ताधारी भाजपाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षांविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. तसेच एका ज्येष्ठ नेत्याने अशी भाषा वापरणे ‘दुर्दैवी’ असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आठवण करून दिली की, आदर्श आचारसंहिता नेत्यांना राजकीय प्रतिस्पर्ध्यावर असत्यापित आरोप करण्यास मनाई करते.









