
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर समोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग. आजवर पुष्करने आपल्या वैविध्यपूर्ण, नैसर्गिक अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहेच. याशिवाय नात्यांसारख्या संवेदनशील विषयांवरील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. इतकेच नाही तर त्याच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. प्रत्येक चित्रपटात त्याचा एक वेगळा प्रयत्न असतो. आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘टॅबू’ असे आहे.








