
पुण्यात मुंबई प्रमाणेच मनसे कार्यकर्त्यांनी दुकाने आणि अस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याची मागणी होती. तसेच, न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महापलिकेने आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने मराठी पाट्या संदर्भातले आदेश काढले आहे. या संदर्भातील सगळी माहिती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. आणि अंमलबजावणी न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.







