
त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या घरच्यांना अनाई मित्र परिवाराला धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. ज्ञानेश्वरचा पाण्यात शोध घेतला जात असतांना त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी नदी आणि धरणाजवळ फिरायला जाताना पाण्याच्या कडेला जाऊ नये. जर पोहायला येत नसेल तर पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, फिरायला जाताना काळजी घेऊन जावे, असे आवाहन केले आहे.







