
पोलिस देखील या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी आले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले. तपासात त्याचे नाव रिचर्ड असल्याचे कळले, तसेच तो विमाननगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेत कामाला असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी सकाळी तो कामावर गेला होता. यानंतर तो फिनिक्स माॅलमध्ये सायंकाळी गेला. यावेळी तो सातव्या मजल्यावरुन खाली पडला, रिचर्ड नेमका खाली कसा पडला, याचा तपास पोलिस करत आहे. त्याच्या मागे आई-वडील असा परिवार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.







