Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune News : सर्वांसमोर अपमान अन् मॅनेजरच्या छळाला कंटाळून पुण्यात ३६ वर्षीय...

Pune News : सर्वांसमोर अपमान अन् मॅनेजरच्या छळाला कंटाळून पुण्यात ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकानं संपवलं जीवन

[ad_1]

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, विशालने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.  ही घटना २१ जून रोजी घडली होती, मात्र हा गुन्हा रविवारी, २१ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा येथील आयटी कंपनीचा मॅनेजर जीशान हैदर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेल्या विशालच्या बहिणीने प्रीती कांबळे यांनी शहरातील खडकी पोलिस ठाण्यात हैदरविरोधात फिर्याद दिली आहे. एफआयआरनुसार, साळवी हे गेल्या १० वर्षांपासून एका आयटी कंपनीत नोकरीला होते. 

हैदर याने विशाल साळवी याला नोकरीवरून काढून टाकण्यापूर्वी इतर कर्मचाऱ्यांसमोरच अपमानित केले आणि बडतर्फ करण्याची धमकी दिली होती. एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे की,  विशालने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर त्याच्या मॅनेजरचा फोटो पोस्ट केला आणि चिठ्ठीत लिहिले की त्याच्या आत्महत्येस मॅनेजर जबाबदार आहे. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हैदरविरोधात खडकी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मॅनेजरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि तपास सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments