
सवलतीचा लाभ घेत पुणेकरांनी रविवार सुट्टीचा दिवस मेट्रोमधून प्रवास करत साजरा केला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. यातून मेट्रोला १ कोटींचे महसूल मिळाले आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर, वनाज व रुबी हॉल मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती.






