Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रPune koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच; बुधवार पेठेतील व्हिडीओ...

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच; बुधवार पेठेतील व्हिडीओ गेम सेंटर लुटले

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच; बुधवार पेठेतील व्हिडीओ गेम सेंटर लुटले

[ad_1]

याप्रकरणी दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यात फरासखाना पोलीस ठाण्यात दस्तगीर शेख ( राहणार -कात्रज ,पुणे) यांनी अनोळखी तीन व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार अभिषेक हे बुधवार पेठेतील दत्त मंदिराच्या बाजूच्या गल्लीमध्ये असलेल्या त्यांच्या व्हिडिओ गेम सेंटर मध्ये काम करत होते. यावेळी कामगारां सोबत संबंधित ठिकाणी असताना, तीन तरुण हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन दुकानात शिरले. त्यांनी दुकानाच्या काउंटरवर तलवारीने मारून तक्रारदार यांना तलवारीचा धाक दाखवून गल्ल्यातील ५ हजार 360 रुपये जबरदस्तीने घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ते मोटरसायकल वरून पळून गेले आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये राजेश प्रेमचंद यादव (वय ३८, रा. कात्रज, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार राजेश यादव यांचे पुणे मनपा जवळ भारत पेट्रोल पंपच्या विरुद्ध बाजूस सवेरा लॉटरी नावाचे दुकान आहे. संबंधित दुकानात तक्रारदार व त्यांचे मित्र हे सदर व्हिडिओ गेम पार्लर मध्ये जेवण करत असताना, अचानक चार अनोळखी व्यक्ती सदर ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्तीने पिस्तूल सारख्या हत्याराचा व तलवारीचा धाक दाखवून दुकानातील कॅश काऊंटर मधील व तक्रारदार यांच्या खिशातील एकूण चार हजार सहाशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरी करून नेले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments