
पिंपरी चिंचवडमध्ये मोशीत होर्डिंग कोसळलं –
तीन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं होतं. यात चार गाड्या होर्डिंगखाली दबल्या होत्या. यात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सायंकाळच्या सुमारास हे होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडल्याने होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार गाड्या अडकल्या. ही वाहने तिथे पार्क केलेली होती. दरम्यान, घाटकोपरमधील घटनेनंतर मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु झालेले आहे.