
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने आयसिस, अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सात लोकांना अटक केली होती. याशिवाय शहरातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपी एनआयएच्या फरार गुन्हेगारांच्या यादीत होते. त्यामुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी अतिरेक्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून आणखी पाच लोकांना अटक केली आहे. याशिवाय मुंढवा, हडपसर, कोंढवा आणि कोथरुड या भागात पोलिसांकडून अटकसत्र सुरू असल्याची माहिती आहे.







