
यावेळी त्याने तिला पोलिसात भरती करण्याचे आमिष दाखवले. यावेळी त्याने तिच्याशी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने याला विरोध केल्याने त्याने तिला धमकावले. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिची बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून १ लाख ३० हजार देखील लुबाडले. दरम्यान, आरोपीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अन्य उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारी नुसार वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.







