Pune Dari Pull accident : पुण्यात जांभूळवाडी दरी पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरची बस, टेम्पो व कारला धडक

0
23
Pune Dari Pull accident : पुण्यात जांभूळवाडी दरी पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरची बस, टेम्पो व कारला धडक

Pune Dari Pull accident: पुण्यातील जांभूळवाडी इथं एक भीषण अपघात झाला आहे. आज (शनिवार) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरी पूल इथं एका भरधाव कंटेनरनं लक्झरी बस, टेम्पो व कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. त्याखाली चिरडून दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात बचाव कार्य सुरू केले आहे.

Source link