
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डेक्कन जिमखाना भागातील कॅफे गुडलकजवळ व्हेल माशाची विक्री करण्याकरिता एकजण थांबला असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना खबऱ्याने दिली. दरम्यान, व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी असल्याने याची किंमत कोट्यवधीच्या घरात असते. याच्या विक्रीवर बाजारात बंदी आहे. असे असतांना याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. यामुळे पुणे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी डेक्कन येथील कॅफे गुडलक याच्या शेजारी सापळा रचला. आरोपी गायकवाड त्या ठिकाणी आला असता त्याला रंगेहात पकडण्यात आले.




