Pune BJP vs ncp : अजित पवारांना महायुतीतून काढा, ते असतील तर आम्हाला सत्ताच नको! भाजपमधील खदखद चव्हाट्यावर

0
20
Pune BJP vs ncp : अजित पवारांना महायुतीतून काढा, ते असतील तर आम्हाला सत्ताच नको! भाजपमधील खदखद चव्हाट्यावर


काय बोलले सुदर्शन चौधरी?

अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढून टाका हेच पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांचं मत आहे. सुभाष बापू, राहुल दादा आणि योगेश दादांवर अजित पवारांनी अन्याय केलाय. हे तिन्ही लोक आतापर्यंत मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळालं असतं. आमचे आबासाहेब सोनावणे डीपीडीसीचा निधी मागायला गेले, तर अजितदादा म्हणाले तुमचा काय संबंध? आम्ही १० टक्के निधी देणार. अजितदादा असेल तर आम्हाला विधानसभेची सत्ताच नको. सोलापूरचीही तीच परिस्थिती आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाहीए. पुणे जिल्ह्याच्या लोकांचं हाल झालेत. ज्या राष्ट्रवादीला आम्ही १०-१० वर्षे विरोध करतोय. ते आता आमच्या भोकांडी बसलेत. अक्षरश: भाजपचे कार्यकर्ते भीतीच्या सावटाखाली आहेत. बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांपासून सर्वांचंच म्हणणं आहे. अजितदादा महायुतीत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ताच नको. कशासाठी पाहिजे? अजितदादा बॉस होणार आणि आदेश देणार?,’ असं चौधरी म्हणाले.



Source link