
पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या डंपरने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात शहरातील चांदणी चौकात दुपारच्या सुमारास झाला. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला असून विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.






