Friday, September 18, 2026
Homeसाताराफलटणच्या नव्या प्रांताधिकारी म्हणून प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

फलटणच्या नव्या प्रांताधिकारी म्हणून प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

फलटण: फलटणच्या नवीन प्रांताधिकारी म्हणून सौ. प्रियंका आंबेकर मॅडम यांनी पदभार स्वीकारला आहे. आज प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी पदग्रहण केल्यानंतर त्यांचे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

याप्रसंगी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल विभागाचे नायब तहसीलदार तुषार गुंजवटे तसेच फलटण तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी श्रीमती आंबेकर यांचे औपचारिक स्वागत केले.

यापूर्वीचे प्रांताधिकारी श्री. सचिन ढोले पाटील यांनी फलटण तालुक्यात प्रभावी प्रशासन आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी विशेष योगदान दिले होते. त्यांच्या कार्यकाळात प्रांताधिकारी कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या कार्याची तालुकाभर चर्चा होती.

आता नव्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर या त्यांच्या धर्तीवर प्रशासन सांभाळतील आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी आशा फलटण तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments