
नाट्यगृहांमध्ये भरपूर सुविधांची वानवा असते. तर, कधी अपुऱ्या सुविधांमुळे प्रेक्षक आणि कलाकार खूप वैतागलेले असतात. आता प्रिया बापट हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये एका नाट्यगृहातील स्थिती पाहायला मिळत आहे. या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या बसण्याच्या ठिकाणी कचरा पसरलेला दिसत आहे. हे दृश्य पाहून प्रिया बापट चांगलीच वैतागली आहे. तिने हा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?’ असं म्हणून तिने आपला संताप व्यक्त केला आहे.







