
मुक्ता सागरच्या फोनवर फोन करुन हे सगळं सागते. मात्र, सागरची होणारी पत्नी तो फोन उचलते आणि या सगळ्यात तिची चूक असल्यामुळे ती कोणालाही याबाबत सांगत नाही. तिकडे सई गायब असल्यामुळे सागरची आई चिडते. बिल्डींगचा सिक्युरिटी गार्ड मुक्ता सईला घेऊन गेल्याची माहिती देतो. ते ऐकून सागरची आई पोलिसात जाऊन मुक्ताच्या आई-वडिलांविरोधात तक्रार करतात. इकडे मुक्ताचा फोन बंद झाल्यामुळे तिला याबाबत काहीच माहिती नसते. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे आज कळेच.








