नांदेड : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे. मराठा आंदोलकांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यात गावात पुढाऱ्यांना बंदी असतांना देखील खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले असता, यावेळी संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली.







