Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनPrajakta Mali: वाढदिवशी प्राजक्ता माळीने दिले चाहत्याना खास गिफ्ट, 'फुलवंती' सिनेमाच्या प्रदर्शनाची...

Prajakta Mali: वाढदिवशी प्राजक्ता माळीने दिले चाहत्याना खास गिफ्ट, ‘फुलवंती’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर

[ad_1]

चित्रपटाविषयी प्राजक्ताने व्यक्त केल्या भावना

”या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले याबद्दल देवाचे अनेकानेक आभार. ‘फुलवंती’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की ‘फुलवंती’च का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले. साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी ‘फुलवंती’ एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ‘फुलवंती’ या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य ‘फुलवंती’ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. ‘फुलवंती’मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. ‘फुलवंती’ आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल” असे प्राजक्ता म्हणाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments