Prajakta Mali: “आज आयुष्यात पहिल्यांदा…”, प्राजक्ताने RSS च्या मंचावरील व्हिडीओ केला शेअर

0
20
Prajakta Mali: “आज आयुष्यात पहिल्यांदा…”, प्राजक्ताने RSS च्या मंचावरील व्हिडीओ केला शेअर


आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता अनेक क्षेत्रांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी आपला कविता संग्रह प्रकाशित केला होता. तर, त्यानंतर तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू करत व्यवसाय क्षेत्रात देखील पदार्पण केले होते. आता प्राजक्ताने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली आहे. प्राजक्ताचे चाहते देखील यावर चर्चा करत आहे. अशातच प्राजक्ताने विजयादशमीनिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण आले आहे.



Source link