Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 65

एक महिन्यापर्यंत रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? जाणून थक्क व्हाल!

0
एक महिन्यापर्यंत रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? जाणून थक्क व्हाल!


Benefits of Drinking Orange Juice Daily for a Month: भारतातील जास्तीत जास्त लोकांची सकाळ एक कप चहाने सुरू होते. अनेकजण दिवसातून कितीतरी वेळा चहा पित असतात. सतत चहा पिण्याची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास शरीराच्या आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. 

Add Zee News as a Preferred Source

 

रक्तपेशी तयार करण्यास मदत होते: 

चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असते शरीरासाठी हानिकारक मानले जाते. याउलट संत्र्‍यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट आणि पोटॅशियम असते. एक महिन्यापर्यंत तुम्ही रोज संत्र्‍याचा ज्यूस प्यायलात तर, रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. तसेच हिवाळ्यात होणार्‍या सर्दी-खोकल्यापासूनही आराम मिळतो. संत्र्‍यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीरात रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात. 

 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात 

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने फक्त शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर,  त्वचेसाठी देखील नुकसानदायक ठरू शकते. यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. पण संत्र्‍याच्या ज्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. त्वचा हायड्रेट राहते आणि व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजन निर्मितीसाठी मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते. 

 

शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते

बऱ्याचदा सकाळी दुधयुक्त चहा प्यायल्याने अनेकांना अ‍ॅसिडीटी होते. संत्र्यामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकून शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करते. चहा प्यायल्याने ताजेपणा तर जाणवतो, पण तो तात्पुताच असतो. याउलट संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास पूर्ण दिवसभर ऊर्जा टिकून राहते. कारण यामध्ये नैसर्गिक साखर असते. 

 

संत्र्याच्या ज्यूसचे अधिक फायदे मिळवण्यासाठी ‘या’ चुका टाळा

1. टेट्राबॉक्स मधील ज्यूस पिणे टाळा. कारण त्यात मोठ्या प्रमाणात रिफाइंड साखरेचा वापर केला जातो. घरच्या घरी ताजे संत्र्याचे ज्यूस तयार करून प्या. 

2. संत्र्यामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते जे दाताच्या इनेमलला हानी पोहोचवू शकते. ज्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. ज्यूस प्यायल्यनंतर लगेचच साध्या पाण्याने गुळण्या करा. 

3. जर तुम्हाला मधुमेह असेल तर संत्र्याच्या ज्यूस ऐवजी फळ खाणे अधिक फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुम्हाला अधिक फायबर मिळेल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढणार नाही. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

 





Source link

फलटण नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय…’ कारभार; प्रभाग १० मधील रस्ते रखडले, खानविलकरांचा थेट मुख्याधिकाऱ्यांना इशारा

0
फलटण नगरपरिषदेत ‘आंधळं दळतंय…’ कारभार; प्रभाग १० मधील रस्ते रखडले, खानविलकरांचा थेट मुख्याधिकाऱ्यांना इशारा

फलटण :-   फलटण नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ या म्हणीची आठवण करून देणारा ठरत आहे. प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते विकासाची कामे अक्षरशः रखडली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात थेट लेखी तक्रार सादर करत प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले आहे.

            प्रभाग १० मधील रस्त्यांच्या कामाचा ठेका ‘व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, वर्क ऑर्डरची मुदत संपूनही ह. बा. कुलकर्णी ते रवी शिंदे गिरण रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना, तसेच परडेकर मठ परिसरातील रस्ते अर्धवट अवस्थेतच आहेत. ठेकेदाराला तीन वेळा नोटिसा देऊनही कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
             विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले असतानाही नगरपरिषद प्रशासन त्याची अंमलबजावणी का करत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा नवीन निविदांमधून कामे देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, यामागे ‘अनुचित लाभ’ दिला जात असल्याचा गंभीर संशय खानविलकर यांनी व्यक्त केला आहे.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरसिंह भाऊसाहेब खानविलकर यांनी उपोषण केले असता, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन प्रत्यक्षात उतरले नसल्याने प्रशासनाच्या विश्वासघाताविरोधात आता जनतेचा संयम सुटत चालला आहे.
             जर प्रभाग १० मधील रखडलेली सर्व रस्ते विकासाची कामे तातडीने सुरू झाली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या इशारावजा तक्रारीमुळे फलटणच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माने परिवाराच्या वतीने परित्राण पाठ व धम्मदीक्षा कार्यक्रम श्रद्धा व धम्ममय वातावरणात संपन्न

0
माने परिवाराच्या वतीने परित्राण पाठ व धम्मदीक्षा कार्यक्रम श्रद्धा व धम्ममय वातावरणात संपन्न


कोळकी (ता. फलटण) :  माने परिवाराच्या वतीने परित्राण पाठ व धम्मदीक्षा समारंभ रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी कोळकी येथे अत्यंत श्रद्धा, शांतता व धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या पवित्र कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता धम्मदीक्षेने झाली. भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते व सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांनी माने परिवाराच्या वतीने भंते काश्यप यांच्याकडे त्रिसरण व पंचशील प्रदान करण्याची याचना केली. त्यानुसार भंते काश्यप यांनी संपूर्ण माने परिवारासह धम्मदीक्षेसाठी उपस्थित असलेल्या सर्व अनुयायांना त्रिसरण व पंचशील प्रदान केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने संरक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे संस्कार सचिव अमोल काकडे, संघटक अरविंद निकाळजे, विजयकुमार जगताप उपस्थित होते.
यानंतर भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते व सरचिटणीस बाबासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धपूजा, भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेल्या २२ धम्म प्रतिज्ञा संपूर्ण माने परिवारासह धम्मदीक्षा घेणाऱ्या सर्वांना दिल्या. उपस्थितांनी त्या प्रतिज्ञा श्रद्धेने स्वीकारल्या. यावेळी 11 उपासक उपासिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
यावेळी भंते काश्यप यांनी परित्राण पाठाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करताना, धम्माच्या आचरणात परित्राण पाठ कसा मानसिक शांती, संरक्षण व सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो, याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर माने परिवाराच्या निवासस्थानी भंते काश्यप यांच्या हस्ते परित्राण पाठाचे पठण करण्यात आले व परिवारासाठी मंगल आशीर्वाद व्यक्त करण्यात आले.
किशोर रामचंद्र माने, पोर्णिमा किशोर माने, मंथन किशोर माने, देवांग किशोर माने, सुहास रामचंद्र माने, रजनी सुहास माने, रिहान सुहास माने, सुहान सुहास माने तसेच बेबीनंदा रामचंद्र माने यांनी परित्राण पाठाच्या माध्यमातून आशीर्वाद स्वीकारले.
हा कार्यक्रम कोळकी (ता. फलटण) येथील माने परिवाराच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर माने परिवाराच्यावतीने भोजनाची व्यवस्था शाहू–फुले–आंबेडकर सभागृह, कोळकी येथे करण्यात आली होतो.
धम्म, समता, करुणा व बंधुत्वाचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

How to Reduce Tummy Fat: 2 उपायांनी पोटाची चरबी कमी करा, Harvard मधील वैज्ञानिकांनी दिल्या टिप्स

0
How to Reduce Tummy Fat: 2 उपायांनी पोटाची चरबी कमी करा, Harvard मधील वैज्ञानिकांनी दिल्या टिप्स


वजन कसे कमी करावे, पोटाची चरबी कशी कमी करावी, किंवा पोटाची चरबी कशी कमी करावी? हे सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत. बहुतेक लोक वाढत्या वजनाबद्दल, विशेषतः पोटाची चरबीबद्दल चिंतित असतात. विशेषतः महिलांना पोटाची चरबीबद्दल काळजी असते. अर्थात, पोटाची चरबी केवळ तुमचे स्वरूपच खराब करत नाही तर अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण करते.

Add Zee News as a Preferred Source

वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेकदा प्रश्न उद्भवतो: चांगला आहार अधिक महत्त्वाचा आहे की शारीरिक हालचाली? हार्वर्ड हेल्थने उत्तर दिले आहे. अलीकडील अभ्यासावर आधारित, हार्वर्ड म्हणतो (संदर्भ) की दोन्ही उपाय तितकेच महत्त्वाचे आहेत. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे म्हटले आहे की योग्य खाणे आणि दैनंदिन शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होऊन वजन आणि शरीरातील चरबी सर्वोत्तम प्रकारे नियंत्रित केली जाऊ शकते.

या अभ्यासात 7256 लोकांच्या आरोग्य डेटाची तपासणी करण्यात आली. त्यांची सरासरी वय सात वर्षे असताना दोनदा चाचणी करण्यात आली. दोन्ही वेळा, त्यांनी भूमध्य आहाराचे पालन केले, ज्यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, काजू, ऑलिव्ह ऑइल आणि इतर निरोगी पदार्थांचा समावेश आहे आणि त्यांच्या शारीरिक हालचालींची पातळी तपासली.

पोटाची चरबी धोकादायक 

पोटाची चरबी वैद्यकीय भाषेत व्हिसेरल फॅट म्हणून ओळखली जाते. ती पोटाच्या आत खोलवर जमा होते. व्हिसेरल फॅट सर्वात हानिकारक मानली जाते कारण ती मधुमेह, हृदयरोग, फॅटी लिव्हर आणि इतर गंभीर समस्यांचा धोका वाढवते.

काय परिणाम झाले?

अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांनी भूमध्यसागरीय आहाराचे पालन केले आणि अधिक सक्रिय राहिले त्यांचे वजन कालांतराने कमी झाले. त्यांच्या शरीरातील एकूण चरबी, कंबरेचा आकार आणि विशेषतः व्हिसेरल फॅटमध्ये मोठी घट झाली.  संशोधकांना असे आढळून आले की ज्यांनी एकाच वेळी आहार आणि शारीरिक हालचाली दोन्ही सुधारल्या त्यांच्यामध्ये सर्वोत्तम परिणाम दिसून आले. या व्यक्तींना शरीरातील चरबीमध्ये, विशेषतः धोकादायक पोटातील चरबीमध्ये सर्वात जास्त घट झाली.

शास्त्रज्ञांचा सल्ला

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की केवळ आहार किंवा व्यायामावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी वजन आणि चांगले आरोग्य राखायचे असेल, तर संतुलित आहारासोबत तुमच्या जीवनात दैनंदिन शारीरिक हालचालींचा समावेश करणे आवश्यक आहे. एकत्रितपणे, हे दोन्ही केवळ वजन नियंत्रित करण्यास मदत करत नाहीत तर गंभीर आजारांचा धोका देखील कमी करतात.





Source link

१० वी युवा बौद्ध धम्म परिषद हुपरी येथे भव्य उत्साहात संपन्नधम्मदेसना, धम्मचर्चा, धम्मदिक्षा, ग्रंथप्रकाशन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा**

0
१० वी युवा बौद्ध धम्म परिषद हुपरी येथे भव्य उत्साहात संपन्नधम्मदेसना, धम्मचर्चा, धम्मदिक्षा, ग्रंथप्रकाशन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा**


हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) :
तरुण पिढीमध्ये बौद्ध धम्माविषयी वैचारिक जाणीव निर्माण करून परिवर्तनवादी चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली १० वी युवा बौद्ध धम्म परिषद – २०२६ रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी नागरत्नजी सभामंडप, यशवंत मंगल कार्यालय, यशवंत नगर (चांदी नगर), हुपरी येथे हजारो बंधू-भगिनींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
ही परिषद युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
धम्मदेसना व धम्मचर्चा
सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत पार पडलेल्या धम्मदेसना सत्रात
पूज्य भन्ते सिरी सारो
(महानाग शाक्यमुनी विज्जासन बुद्धिस्ट सेमिनरी, कर्जत, जि. रायगड)
यांनी “बौद्ध धम्म क्रांतीची पाच सूत्रे” या विषयावर सखोल धम्मदेसना दिली.
धम्मचर्चा सत्रात
मा. चिन्मयी सुमित (सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री)
यांनी “परिवर्तनवादी परंपरेचे वारसदार म्हणून आपली जबाबदारी” या विषयावर परखड विचार मांडले.
उद्घाटन
परिषदेचे उद्घाटन
मा. मंगलराव माळगे (नगराध्यक्ष, नगर परिषद हुपरी)
आणि
मा. शिवराज नाईक (चेअरमन, पैसाफंड बँक, हुपरी)
यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रंथप्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम
या वेळी ‘ज्ञानकांड – भाग १’ व ‘वारी समतेची’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले तसेच ठराव फलकांचे अनावरण झाले.
सांस्कृतिक सत्रात ‘निळं वादळ’ शाहीर उदय भोसले व त्यांच्या सहकलाकारांनी प्रबोधनात्मक सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
द्वितीय सत्र
दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत
भन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६,
धम्मदिक्षा प्रमाणपत्र वितरण व ठराव वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
मान्यवर उपस्थिती
या परिषदेसाठी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली –
मा. मानसिंगराव देसाई (ज्येष्ठ नेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
मा. वैभवदादा कांबळे (आंबेडकरी नेते, कोल्हापूर जिल्हा)
मा. सुधाकर कांबळे (सचिव, हुपरी बौद्ध विहार प्रतिष्ठान)
मा. नम्रता कांबळे (नगरसेविका, हुपरी)
मा. नानासाहेब कांबळे (धम्मसेवक)
मा. निवास धनवडे (विद्यमान नगरसेवक, पेठ वडगाव)
मा. शिवाजी हुपरीकर (सामाजिक कार्यकर्ते, हुपरी)
मा. मिलिंद सनदी (विद्यमान नगरसेवक, पेठ वडगाव)
मा. प्रा. आदिनाथ कांबळे (उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी)
मा. मंदिप कांबळे (सामाजिक कार्यकर्ते, हुपरी)
प्रमुख उपस्थिती
मा. सुनील कल्याणी, मा. अरविंद धरणगुत्तीकर, मा. पांडूरंग मानकापुरे,
मा. संदिप पोळ, मा. डॉ. संजय पाईकराव, मा. भिमराव संघमित्रा,
मा. वंदन कांबळे, मा. नेताजी मधाळे, मा. डॉ. स्वनिल हुपरीकर,
मा. डॉ. अनिल माने, मा. प्रमोद हुपरीकर, मा. बाबासाहेब वडगावकर,
मा. शितल कांबळे, मा. आनंदराव राणे, मा. एम. टी. कांबळे,
मा. रामचंद्र चव्हाण, मा. संगिता कांबळे, मा. सुशांत कांबळे,
मा. दिलीप शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजन समिती व नेतृत्व
या परिषदेचे यशस्वी आयोजन
प्रा. डॉ. किरण सदानंद भोसले
(संस्थापक अध्यक्ष, युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य)
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
संयोजन समितीत
खॉ. संतोष भोसले, मा. सतिश भारतवासी, प्रा. रणजितसिंह भोसले, मा. बापूसाहेब राजहंस, मा. अनिता गवळी, मा. मुक्ताताई भास्कर, मा. वंदना कांबळे, मा. अक्षय कांबळे, मा. संतोष उर्फ रेगन कांबळे, मा. विजय कांबळे, मा. अमर कांबळे, डॉ. अतुल कांबळे, मा. मंदार कुरणे, मा. संतोष गडकर, मा. अजित कांबळे, मा. भगवान कांबळे, मा. दत्तात्रय कांबळे, मा. राकेश धनवडे, मा. संदेश पाटील, मा. अश्विनी कांबळे, मा. कृष्णा कांबळे, मा. भरत कांबळे, मा. विजय पाटील, मा. दिक्षम कांबळे, मा. विकास कांबळे, मा. नितिन कानडे, मा. आकाश कांबळे, मा. धनाजी कांबळे, मा. रंगराव कांबळे, मा. पल्लवी कांबळे, मा. प्रबोध कांबळे, मा. वैशाली कांबळे, मा. प्रविणकुमार पालके, मा. ज्योती डोंगरे, मा. सुनिता खिल्लारे, मा. विजयकुमार चोपडे, मा. लक्ष्मी कांबळे, मा. बाळाबाई कांबळे, मा. भाग्यश्री भंडारे, मा. भगवान बुचडे, मा. तुकाराम साकेकर, मा. पवन भोसले, प्रा. डॉ. सुदर्शन माने, मा. सुनिल कांबळे, मा. काकासाहेब कुरळुपे, मा. अमित कांबळे-सर, मा. सुनिल कानडे, मा. सदानंद भोसले, मा. भास्कर कांबळे-सर, मा. श्रीकांत मिठारे-सर, मा. सुधीर भोसले, मा. रंजना पठारे, मा. बाबासाहेब माने-सर, मा. विशाल शिंदे, मा. संजिवन लोंढे, मा. श्रीकांत कांबळे-सर, मा. पी. ए. कांबळे-सर यांचा समावेश होता.
परिषदेचा समारोप “नमो बुद्धाय ! जय भीम ! जय संविधान !” या घोषणांनी करण्यात आला.

29 महानगरपालिकांचा अंतिम निकाल; कुणाची कुठे सत्ता, कोणत्या पालिकेत कुणाचा महापौर?, A टू Z माहिती

0


Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर

पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर



Source link

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका आयोजित धम्मदीक्षा समारंभ उत्साहात व धम्ममय वातावरणात संपन्न

0
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका आयोजित धम्मदीक्षा समारंभ उत्साहात व धम्ममय वातावरणात संपन्न


फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने राज्याचे संघटक तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित धम्मदीक्षा समारंभ अत्यंत शांत, धम्ममय व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी तालुका सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संघटक अरविंद निकाळजे, संस्कार सचिव अमोल काकडे, संरक्षण सचिव राजेंद्र गायकवाड यांच्या सक्रिय सहभागातून अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडले.

या धम्मदीक्षा समारंभास भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांचे संस्कार सचिव मा. सोमीनाथ घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार पाठपद्धतीनुसार विधीपूर्वक गाथांसह बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. धम्मदीक्षा स्वीकारणाऱ्या उपासक व उपासिकांना भंते काश्यप यांनी त्रिशरण व पंचशील दिले.
यानंतर मा. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दिलेल्या बावीस धम्म प्रतिज्ञा उपस्थित उपासक-उपासिकांकडून विधिवत स्वीकारून घेतल्या.

मिशन २५ अंतर्गत धम्म चळवळ गतिमान करण्याचे आवाहन

या वेळी बोलताना मा. सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बुद्धमय करण्याचा जो संकल्प केला होता, तो पूर्णत्वास नेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने ‘मिशन २५’ अंतर्गत विविध कार्यक्रम, शिबिरे व धम्मदीक्षा समारंभ राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तालुका पातळीवर विविध ठिकाणी धम्मदीक्षा घेऊन ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे.”
धम्मदीक्षा घेतलेल्या उपासक-उपासिकांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन धम्म चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन त्यांनी केले. “सम्राट अशोकाने युद्धाचा मार्ग सोडून बुद्धाचा मार्ग स्वीकारला. त्याने महेंद्र व संघमित्रा यांना धम्म प्रचारासाठी पाठवले. आज तुम्हा सर्वांचा नवा जन्म झाला असून, तुम्हीही धम्म प्रचारक बनून समाजात बुद्धाचा विचार पोहोचवावा,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले.

भंते काश्यप यांनी धम्मदेसना देताना सांगितले की, “धम्म हा वाहत्या पाण्यासारखा आहे. जसे गंगेचे पाणी सतत वाहत राहते, तसाच धम्माचा विचारही समाजात प्रवाही राहिला पाहिजे. पाणी साचले की दुर्गंधी निर्माण होते; तसेच धम्म आचरणात न आणल्यास तो केवळ शब्दरूपातच उरतो.”
परित्राण पाठाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, “परित्राण म्हणजे मनाचे संरक्षण. रोजच्या जीवनात धम्माचे आचरण, पंचशील पालन आणि दसपारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यासच खरी धम्मदीक्षा सफल ठरते.” सर्व उपासक-उपासिकांनी शुद्ध आचरण, करुणा, मैत्री व प्रज्ञेचा मार्ग स्वीकारून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मविचार समाजात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या समारंभात एकूण ११ उपासक-उपासिकांनी धम्मदीक्षा स्वीकारली. त्यामध्ये प्रतिभा बाळासाहेब माने, वेदांती बाळासाहेब माने, शोभा रमेश झेंडे, रमेश दुष्यासन झेंडे, किशोर रामचंद्र माने, पौर्णिमा किशोर माने, रजनी सुहास माने, सुहास रामचंद्र माने, बेबीनंदा रामचंद्र माने, माया सचिन गायकवाड व सचिन सर्जेराव गायकवाड यांचा समावेश होता.
यावेळी कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी १० सक्रिय सभासदांची तसेच ११ नवीन बौद्ध सभासदांची नोंदणी करून घेतली.

या समारंभात सुहास रामचंद्र माने व किशोर रामचंद्र माने यांनी संपूर्ण कुटुंबासह धम्मदीक्षा घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व उपासक – उपासिकांसाठी भोजनदान केले.
या धम्मदीक्षा समारंभात बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संपूर्ण विधीचे संचालन तालुका सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संघटक अरविंद निकाळजे, संस्कार सचिव अमोल काकडे व संरक्षण सचिव राजेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने पार पडले.

या वेळी वंचित चित्राताई गायकवाड, ॲड. श्याम अहिवळे, विशाल पाटील, मंगेश सावंत, कुणाल मोरे, शरद मोरे, निलेश सुरेश अहिवळे, आरती विशाल पाटील, परिणिता सुनील कांबळे, विद्या खंदारे, श्रुतिका अहिवळे, ज्योती अमोल काकडे, स्नेहल निलेश अहिवळे, संध्या काकडे, त्रिशला जावळे, मनिषा काटकर, चंद्रकांत काटकर, प्रथमेश काटकर व ज्योतीराम काटकर उपस्थित होते.

येत्या तीन-चार दिवसांत खुंटे व कोळकी येथे उपासिका शिबिर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अशा प्रकारे हा धम्मदीक्षा समारंभ बौद्ध विचारांचा प्रसार, संघटन बळकटी आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

कडाक्याच्या थंडीत ‘हा’ पदार्थ आतून शरीर ठेवले गरम, घरीच बनवा लाडू

0
कडाक्याच्या थंडीत ‘हा’ पदार्थ आतून शरीर ठेवले गरम, घरीच बनवा लाडू


हिवाळ्यात गोड पदार्थांची तीव्र इच्छा निर्माण होते. परिणामी, लोक भरपूर जिलेबी, गुलाब जामुन, गाजर हलवा, मूग डाळ हलवा आणि बरेच काही खातात. हिवाळ्यात हे पदार्थ आनंददायी असले तरी, वजन वाढणे, साखर, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाचा धोका देखील निर्माण करतात. जर तुम्ही हिवाळ्यात काही निरोगी आणि चविष्ट पदार्थ शोधत असाल तर घरगुती प्रोटीन लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. हे लाडू केवळ तुमच्या गोड पदार्थांची इच्छा पूर्ण करत नाहीत तर आवश्यक पोषण आणि प्रथिने देखील प्रदान करतात.

Add Zee News as a Preferred Source

पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, सुकामेवा, नारळ, ओट्स, तीळ आणि खजूर वापरून बनवलेले लाडू हिवाळ्यात अत्यंत फायदेशीर असतात. ते प्रथिने, फायबर, निरोगी चरबी आणि उर्जेने समृद्ध असतात, जे थंडीच्या काळात शरीराला उबदार आणि सक्रिय ठेवण्यास मदत करतात. फिटनेस उत्साही आणि सर्व वयोगटातील लोक सहजपणे त्यांचा आनंद घेऊ शकतात.

ड्राय फ्रूट लाडू

जर तुम्हाला काजू आणि सुकामेवा आवडत असतील, तर हे ड्राय फ्रूट लाडू तुमच्यासाठी एक परिपूर्ण आणि आरोग्यदायी गोड पर्याय आहेत. ते बनवण्यासाठी तुम्हाला ५० ग्रॅम सुकामेवा आणि काजू जसे की काजू, अक्रोड, बदाम, पिस्ता, मनुका आणि सुक्या क्रॅनबेरीची आवश्यकता असेल.

ड्राय फ्रूट लाडू कसे बनवायचे
ते हलके कोरडे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर बारीक बारीक करा. नंतर, दहा खजूरांचे खड्डे काढून टाका, पेस्ट बनवा आणि नट मिश्रणात घाला. जर मिश्रण कोरडे वाटत असेल तर आवश्यकतेनुसार थोडा वितळलेला गूळ घाला, चांगले मिसळा आणि लहान लाडू बनवा.

नारळ आणि प्रथिने लाडू
नारळ आणि मठ्ठा प्रथिने वापरून बनवलेला हा लाडू स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहे. प्रत्येक लाडूमध्ये अंदाजे २६ ग्रॅम प्रथिने असतात. ते तयार करण्यासाठी, २० मिली दूध, १ टेबलस्पून तूप, १ स्कूप मठ्ठा प्रोटीन पावडर आणि ४० ग्रॅम किसलेले नारळ एकत्र करा.

नारळ आणि प्रथिने लाडू कसे बनवायचे
हे मिश्रण एका भांड्यात ठेवा आणि चांगले मिसळा. गरज पडल्यास जास्त दूध किंवा प्रथिने पावडर घाला आणि मिश्रण पीठात मळून घ्या. मिश्रण तयार झाल्यावर, इच्छित आकाराचे लाडू बनवा.

ओट्स आणि तीळ लाडू
ओट्स, तीळ आणि अळशीच्या बियाण्यांनी बनवलेले हे लाडू सुपरफूड्सने भरलेले आहे, जे प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत प्रदान करते आणि हिवाळ्यात ऊर्जा प्रदान करते.





Source link

हायपरटेंशन म्हणजे काय? डायबिटिस आणि इतर आजारांमुळे याचा शरीरावर काय परिणाम होतो?

0
हायपरटेंशन म्हणजे काय? डायबिटिस आणि इतर आजारांमुळे याचा शरीरावर काय परिणाम होतो?


उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब हा बहुतेकदा मूक हत्यारा म्हणून ओळखला जातो कारण त्याची सुरुवातीची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत, परंतु हळूहळू तो अनेक महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवतो. एशियन हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख आणि सहयोगी संचालक डॉ. सुनील राणा म्हणतात की बदलत्या जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः जेव्हा ते मधुमेह, मायग्रेन किंवा हृदयरोगासारख्या आजारांशी जोडले जाते तेव्हा धोका अनेक पटींनी वाढतो. विविध आजार असलेल्या लोकांना उच्च रक्तदाब कसा प्रभावित करतो याचा तपशीलवार शोध घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

जेव्हा धमन्यांमध्ये रक्तदाब सामान्यपेक्षा सतत जास्त राहतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. साधारणपणे, १२०/८० मिमीएचजी सामान्य मानले जाते, तर दीर्घकाळ यापेक्षा जास्त वाचन उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते. डॉक्टर म्हणतात, “उच्च रक्तदाब ही स्वतःच एक गंभीर समस्या आहे, परंतु जेव्हा ती इतर आजारांसोबत येते तेव्हा शरीरावर त्याचा परिणाम आणखी धोकादायक होतो.” हे देखील वाचा – काउंटरवर उपलब्ध असलेल्या आय ड्रॉप्सचा वापर केल्याने डोळ्यांच्या या ५ समस्या उद्भवू शकतात, असा इशारा एका डॉक्टरने तरुणांना दिला आहे.

मधुमेहासह उच्च रक्तदाब

मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचे मिश्रण सर्वात धोकादायक मानले जाते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. उच्च रक्तातील साखर आणि उच्च रक्तदाब एकत्रितपणे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. डॉ. राणा स्पष्ट करतात, “जर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रित केला नाही तर हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंत लवकर उद्भवू शकते.”

मायग्रेनसह उच्च रक्तदाब

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब डोकेदुखीची तीव्रता आणि वारंवारता वाढवू शकतो. उच्च रक्तदाब मेंदूतील रक्तवाहिन्यांवर दबाव वाढवतो, ज्यामुळे डोकेदुखी अधिक तीव्र होते. डॉ. म्हणतात, “जर मायग्रेनच्या रुग्णांनी त्यांच्या रक्तदाबाकडे दुर्लक्ष केले तर वेदना बराच काळ टिकू शकतात आणि औषधांची प्रभावीता देखील कमी होऊ शकते.” हे देखील वाचा – हिवाळ्यात दररोज गुळाचे पाणी प्यायल्यास काय होते? येथे ३ फायदे आहेत.

हृदयरोगासह उच्च रक्तदाब

डॉक्टर म्हणतात की उच्च रक्तदाब हा हृदयरोगासाठी सर्वात मोठा जोखीम घटक आहे. यामुळे हृदयाच्या स्नायू जाड होतात, ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते. यामुळे हृदय अपयश आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

मूत्रपिंडाच्या आजारासह उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब मूत्रपिंडांच्या फिल्टरिंग क्षमतेला बिघडवतो. मूत्रपिंडाचा आजार रक्तदाब आणखी वाढवू शकतो, ज्यामुळे एक दुष्टचक्र निर्माण होऊ शकते.





Source link

महाराज आता तिकीट द्या नाहीतर दोरी द्या, इथंच…. उदयनराजे भोसलेंकडे समर्थकाची अजब मागणी

0


सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषद आणि अकरा तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मसूर जिल्हा परिषद गटाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग असं आहे. या गटातून साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर तयारी करत आहेत. आज त्यांनी कुलदीप क्षीरसागर यांनी साताऱ्यात जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. कुलदीप क्षीरसागर यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला अशी मिश्कील टिप्पणी केली आहे. 

साताऱ्यात सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट कसे मिळेल याकडे लक्ष लावून बसले आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे सुद्धा मसूर जिल्हापरिषद गटामधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.या आधी सुद्धा झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. या आधी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप शिरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते.परंतु उदयनराजे भोसले यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.त्यामुळे कुलदीप शिरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे भोसले यांच्याकडे केली.

“आता उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला इथंच” अशी मिश्कील टिप्पणी  उदयनराजे भोसले यांच्यासोबत बोलत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी केली. उदयनराजे भोसले यांना कुलदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यामुळं हसू आवरले नाही. 

साताऱ्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढणार?

साताऱ्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “महायुतीत एकमत झाले तर ठीक आहे. *मात्र जर युती झाली नाही, तर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढायला मोकळा आहे. प्रत्येक पक्षाची या जिल्ह्यात आपापल्या पद्धतीने ताकद आहे,” असे वक्तव्य केलं आहे.  

आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या बैठकीस कोणी उपस्थित राहायचे, याचा निर्णय पक्षातील सर्वजण मिळून घेतील. मात्र बैठकीत काय निष्पन्न होईल, याचा अंदाज बांधता येणार नाही. एकमत न झाल्यास प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवेल, अशी भूमिका मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link