Friday, July 31, 2026
Home Blog Page 547

Budget 2025: अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

0
Budget 2025: अर्थसंकल्प पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स


Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी २०२५) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार ३.० चा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण काही कारणास्तव ऐकता आले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्प आणि संबंधित कागदपत्रे डाउनलोड करण्याच्या सोप्या टीप्स सांगत आहोत. दरम्यान, सर्व अर्थसंकल्पाची पीडीएफ फाईल डाउनलोड कसे करायचे, याबाबत जाणून घेऊयात.



Source link

Traffic Challan: ‘या’ रंगाचे शर्ट-टी शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म! ऐकून बसेल धक्का!

0
Traffic Challan: ‘या’ रंगाचे शर्ट-टी शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म! ऐकून बसेल धक्का!


Traffic Rules: रस्त्यावर गाडी चालवताना नियमांचे पालन न केल्यास ट्रॅफिक पोलीस तुमचं चलान कापतात. आता तंत्रज्ञानही प्रगत झालंय. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस नसले तरी नियम तोडणाऱ्यांना दंड हा भरावाच लागतो. तुम्ही निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवली तर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा फोटो कॅप्चर करतो आणि त्याद्वारे चलान जारी केले जाते. लाल सिग्नल तोडला,वाहन स्टॉप लाईनवर पार्क केले, जास्त वेगाने गाडी चालवली अशावेळी भूर्दंड हा भरावा लागतो. चलान भरणं हा प्रकार कोणाला आवडत नाही. पण तुम्ही परिधान केलेल्या शर्ट टीशर्टच्या रंगामुळे तुम्हाला चलान भरावे लागत असेल तर? ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण एका चालकाला यासाठी चलान जारी झालंय. हे तुमच्यासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आजकाल प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे वाहतूक पोलिस नसले तरी कॅमेरे वाहन चालकांच्या सर्व हालचाली टिपतात. वाहतूक विभागानेही AI चा वापर करायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही चूक केली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हे सर्व बरोबर आहे. पण कपड्यांच्या रंगामुळे कधी चलन मिळू शकते का? तुम्ही असा विचारही केला नसेल. पण हे प्रत्यक्षात घडलंय. 

काळा टी-शर्ट घातल्याने एका चालकाला दंड ठोठावण्यात आला. केशव किस्ले असे या तरुणाचे नाव असून त्याने X या सोशल मीडिया अकाऊंटवर आलेला धक्कादायक अनुभव शेअर केलाय. मी काळ्या रंगाशिवाय काहीही घालत नाही. मी सीटबेल्ट लावला होता पण तरीही मला चलान आले, असे केशव आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. 

ही घटना 27 जानेवारी 2025 ची आहे. देशातील आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. केशव किसले हा तरुण व्यवसायाने इंजिनीअक आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्याने बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांना टॅग करत त्यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली आहे. 

 

गाडी चालवताना मी नेहमीच सीट बेल्ट लावतो, तरीही सीट बेल्ट न लावल्याचे कारण दाखवत मला अलिकडेच एक चलन मिळाले आहे. काळी टी-शर्ट घातलेली व्यक्ती सीट बेल्ट कायद्याचे पालन करत आहे की नाही हे तुमची कॅमेरा सिस्टीम कशी ठरवते? असा प्रश्न त्याने वाहतूक पोलिसांना विचारला.

केशवने चलनासोबत त्याच्या गाडीचा फोटोही जोडला आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक पोलिसांनी त्याला ईमेलद्वारे तक्रार नोंदवण्यास सांगितले. मला सापडलेल्या नंबरवर कोणीही फोन उचलत नाही, असे केशव म्हणतो. 

अशी घटना का घडली?

मनीकंट्रोलच्या एका अहवालानुसार, रस्त्यांवर बसवलेले कॅमेरे सीट बेल्ट आणि काळे कपडे यात फरक करू शकत नाहीत. या प्रकरणातही असेच घडले आहे. कारण चलन स्वयंचलित प्रक्रियेद्वारे जारी केले गेले जाते. म्हणजेच जर त्याजागेवर पोलीस उभे असते  तर काहीच अडचण आली नसती. याचा अर्थ कॅमेऱ्यापासून ते त्याच्या AI सिस्टीमपर्यंत सर्वकाही अपडेट करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि पोलिसांना सर्व माहिती मिळाल्यानंतर केशवचे चलन रद्द करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना एखादे चलान आले तर ते चूक कोणाची? वैगेरे विचार न करता तात्काळ भरुन टाकतात. ते पोलीस स्थानकाची पायरी सहसा चढत नाहीत. पण तंत्रज्ञानाच्या अनेक चांगल्या पैलूंमध्ये अशी एखादी त्रुटीदेखील उघड होऊ शकते, ज्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो, हे या घटनेतून समोर आले आहे.





Source link

Mahakumbh : महाकुंभात ‘या’ दिवसापासून दिसणार नाहीत नागा साधू, या कामासाठी सोडणार प्रयागराज, पुन्हा कधी दिसणार?

0
Mahakumbh : महाकुंभात ‘या’ दिवसापासून दिसणार नाहीत नागा साधू, या कामासाठी सोडणार प्रयागराज, पुन्हा कधी दिसणार?



Mahakumbh : प्रयागराजला 13 जानेवारीला सुरु झालेल्या महाकुंभ मेळा हा 26 फेब्रुवारी 2025 संपणार आहे. पण त्यापूर्वीच या विशेष दिवसानंतर नागा साधू विशेष कामासाठी प्रयागराजमधून निघून जाणार आहे. त्यानंतर ते पुन्हा कदी दिसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
 



Source link

50 नवीन पर्यटनस्थळे, होम स्टेसाठी मुद्रा लोन घेता येणार; पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

0
50 नवीन पर्यटनस्थळे, होम स्टेसाठी मुद्रा लोन घेता येणार; पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा


Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनासाठी तरतूद केली आहे. होम स्टेसाठीही आता मुद्रा लोन घेता येणार आहे. पर्यटन क्षेत्र आणि हॉस्पिटीलिट सेक्टर (हॉटेल व रेस्तराँ उद्योगाला) अधिक चालना मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषणादरम्यान म्हटलं होतं की, भारतातील इतर राज्यांसोबत मिळून 50 नवीन पर्यटनस्थळ विकसीत केले जातील. 

होम स्टेला मुद्रा योजनेंतर्गंत कर्ज घेता येणार असल्याने होम स्टेसारख्या छोट्या उद्योगांना हातभार लागणार आहे. तसंच, होम स्टेच्या व्यवसायात वाढ होऊ शकतो. पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. 

निर्मला सीतारमण यांनी मेडिकल टुरिजमला चालना देण्यासाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. खासगी क्षेत्रासोबत भागीदारी करुन भारतात वैद्यकीय सेवांसाठी येणाऱ्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. विदेशात उपचारांसाठी भरपूर खर्च येतो. अशावेळी विदेशातून लोक भारतात उपचार घेण्यासाठी येतात. 

प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन उडान स्कीम अंतर्गंत 120 नवीन शहरे जुडणार आहेत. उडान योजनेंतर्गंत भारतातील ज्या शहरात विमानसेना नाही तिथे विमानतळ बांधण्यात येईल. उडान ही पंतप्रधान मोदींची महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी असेही म्हटले आहे की त्यांना चप्पल घालून विमानात चढताना लोकांना पहायचे आहे. यावेळी निर्मला सीतारमण यांनी त्यांचे आठवे बजेट सादर केले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे पूर्ण अर्थसंकल्प आहे. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

Budget 2025, tourism development, new tourist destinations,Budget 2025, Union Budget 2025, Budget 2025 Live Updates, budget 2025 income tax slab, rail budget 2025, defence budget 2025, Budget 2025 highlights, Budget 2025 highlights hindi, budget 2025





Source link

आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट ‘तुला जपणार आहे’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट ‘तुला जपणार आहे’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Tula Japnar Aahe : धमाकेदार मालिकांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका हटके आणि वेगळी ठरणार आहे. ‘तुला जपणार आहे’ या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा रंगली. या मालिकेत कोणते कलाकार पाहायला मिळणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. तर या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसेच, या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे ह्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.



Source link

Union Budget 2025: Income Tax संदर्भात मोठी घोषणा, पुढील आठवड्यात….

0
Union Budget 2025: Income Tax संदर्भात मोठी घोषणा, पुढील आठवड्यात….


पुढील
बातमी

Budget 2025 : निर्मला सीतारामन यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट





Source link

Kisan Credit Card: मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेत केली वाढ

0
Kisan Credit Card: मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेत केली वाढ


Modi Government Budget 2025: भारत सरकारकडून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली. यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपये होती. यावेळी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढणार असल्याची बरीच चर्चा झाली होती.



Source link

भारत-इंग्लंड 4th T20 Thriller:शिवम दुबेला दुखापत, हार्षित राणा ‘कन्सक्शन सब्स्टिट्यूट’ म्हणून मैदानात उतरला!

0
भारत-इंग्लंड 4th T20 Thriller:शिवम दुबेला दुखापत, हार्षित राणा ‘कन्सक्शन सब्स्टिट्यूट’ म्हणून मैदानात उतरला!

पुणे साहस Times: चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडने भारताला चांगलंच झुंजवलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. दुसऱ्यात एकही धाव न घेत तीन विकेट गमावले होते. त्यामुळे भारताचा सन्मानजनक स्कोअर होईल की नाही अशी शंका होती. पण हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेने डाव सावरला आणि भारताला 181 धावांपर्यंत पोहोचवलं. खरं तर ही धावसंख्या गाठणं इंग्लंडला वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण बेन डकेट आणि फिल सॉल्टने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. या जोडीने 62 धावांची भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर रवि बिष्णोईला बेन डकेटची विकेट मिळाली. त्यानंतर दुसऱ्या षटकात अक्षर पटेलने फिलिप सॉल्टला बाद केलं. सातव्या षटकात पुन्हा एकदा रवि विष्णोईने कर्णधार जोस बटलरला बाद केलं आणि सामन्यात असल्याचं दाखवून दिलं. पण या सामन्यात 10 षटकांचा सामना संपला तेव्हा अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्षित राणाची एन्ट्री झाली. पण हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असलेले आणि टीव्हीवर सामना पाहात असलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण 12वं षटक हार्षित राणाच्या हाती सोपवलं गेलं. हार्षित राणा प्लेइंग 11 मध्ये नसताना हे कसं काय शक्य झालं असा प्रश्न सर्वांना पडला. तर त्याचं उत्तर असं की, शिवम दुबेला झालेली दुखापत..

शिवम दुबेने 34 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. भारताच्या डावात शेवटचं षटक जेमी ओवर्टन टाकत होता. या षटकाचा पाचवा सामना खेळण्यासाठी शिवम दुबे समोर होता. यावेळी शिवम दुबेच्या हेल्मेटवर जोरात चेंडू आदळला. खरं तर हा चेंडू इतका जोरात आदळला की, शिवम दुबेला लागला असणार यात शंका नाही. वैद्यकीय टीम मैदानात धाव घेतली. पण सर्व काही व्यवस्थित असल्याचं सांगत शिवम दुबे शेवटचा चेंडू खेळला. पण फिल्डिंगला मैदानात उतरला नाही. त्याच्या ऐवजी मैदानात हार्षित राणा आला. त्याला कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून संघात स्थान मिळालं. त्याच्याकडे कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू सोपवला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट काढली. लियाम लिविंगस्टोनला तंबूत पाठवलं.

प्लेयर म्हणून हार्षित राणाचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने विकेट घेत टी20 मध्ये पाऊल टाकलं. टी20 मध्ये कन्सक्शन सब्सिट्यूट पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कसोटी आणि वनडे सामन्यात अशा प्रकारे खेळाडू खेळले आहेत. पण टी20 कन्सक्शन सब्सिट्यूट म्हणून हार्षित राणा हा पहिलाच प्लेयर आहे. यात हार्षित राणा हा शिवम दुबेचा कन्सक्शन सब्सिट्यूट ठरला. कारण दोघंही वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळाली.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना रंगतदार वळणावर असताना अचानक पहिल्या दहा षटकानंतर संघात बदल झाला. शिवम दुबे संघातून आऊट झाला आणि हार्षित राणाने सब्सिट्यूट म्हणून टी20 मध्ये पदार्पण केलं. यावेळी त्याने पहिल्या षटकात लिविंगस्टोनची विकेट काढली.

Viral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

0
Viral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस! व्हिडिओ पाहून बसेल धक्का


Udit Narayan Viral Kiss Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण हे इंडस्ट्रीतील दिग्गज गायकांपैकी एक आहेत. उदित यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम गाणी दिली आहेत, जी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडतात. मात्र, आता उदित नारायण यांचा नवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. इतकंच नाही तर, हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.



Source link

GBS: राज्यात जीबीएसचा चौथा बळी! आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

0
GBS: राज्यात जीबीएसचा चौथा बळी! आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी


Maharashtra GBS News: जीबीएस हा आजार रुग्णांच्या जीवावर उठला असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जीबीएस आजारावर नियंत्रण मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.



Source link