Saturday, July 25, 2026
Home Blog Page 412

Maharashtra News LIVE Updates: कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

0
Maharashtra News LIVE Updates: कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार करणार भाजपात प्रवेश



Marathi Breaking News LIVE Updates: गेल्या काही दिवसांत राज्यातील राजयकीय क्षेत्रात विविध घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, यासाठी शिवसेनाही (एकनाथ शिंदे) आग्रही असल्यामुळे तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. अशात काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी भेट दिल्याने पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे राज्यात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. याचबरोबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. तसेच राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर विविध क्षेत्रांतील बातम्यांचा लाईव्ह आढावा घेऊया.



Source link

चटके देणाऱ्या उकाड्यात दिलासा देणारी बातमी; यंदाच्या वर्षी देशात कसा असेल Monsoon? IMD नं स्पष्टच सांगितलं….

0
चटके देणाऱ्या उकाड्यात दिलासा देणारी बातमी; यंदाच्या वर्षी देशात कसा असेल Monsoon? IMD नं स्पष्टच सांगितलं….


No match is being played.

Apr 14, 2025 | Match 30

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 166/7

VS

LSG

168/5(19.3 ov)

Chennai Super Kings beat Lucknow Super Giants by 5 wickets
Full Scorecard →

Apr 13, 2025 | Match 29

Indian Premier League, 2025

MI

(20 ov) 205/5

VS

DC

193(19 ov)

Mumbai Indians beat Delhi Capitals by 12 runs
Full Scorecard →

Apr 13, 2025 | Match 28

Indian Premier League, 2025

RCB

(20 ov) 173/4

VS

RR

175/1(17.3 ov)

Royal Challengers Bengaluru beat Rajasthan Royals by 9 wickets
Full Scorecard →





Source link

गृहमंत्र्याच्या शहरातील मध्यरात्रीनंतरचा थरार, कॅफे मालकावर अंधाधुंद गोळीबार

0
गृहमंत्र्याच्या शहरातील मध्यरात्रीनंतरचा थरार, कॅफे मालकावर अंधाधुंद गोळीबार


नागपूर : शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित कॅफेच्या समोर लांजेवार नामक गुंडाच्या टोळीने धुडगूस घालून कॅफे मालकावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कॅफेमालक अविनाश राजू भुसारी (२८) गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. कॅफेसमोर अचानक गोळीबार होताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे कॅफे परिसरात गोंधळ उडाला होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगर चौकात सोशा नावाचा नामांकित कॅफे पार्लर आहे. या पार्लरमध्ये गेल्या काही दिवसांपासून लांजेवार नावाचा कुख्यात गुन्हेगार आपल्या टोळीसह नियमित होता. मात्र, तो कॅफे मालक अविनाशला नेहमी दमदाटी करून धमकी देत होता. यासोबत अविनाश भुसारी आणि लांजेवार यांच्यात जुना वाद सुद्धा होता. सोमवारी रात्री दीड वाजता वाजताच्या सुमारास लांजेवार हा आपल्या तीन साथीदारांसह सोशा कॅफेत आला. तेथे अविनाश भुसारी आणि निंबस कॅफेचे मालक आदित्य हे दोघेही आईसस्क्रीम खात बसलेले होते. दोन दुचाकींनी आलेल्या लांजेवार व त्याच्या साथीदारांनी अविनाश भुसारी यांच्याशी वाद घातला. वाद वाढताच लांजेवारने आपल्या पाठीमागे लपवलेली पिस्तूल काढून अविनाश वर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवळपास सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या अविनाश ला लागल्या. अचानक कॅफेमध्ये गोळीबाराचा आवाज येताच एकच गोंधळ उडाला. कॅफेतील कर्मचाऱ्यांनी पळापळ केली तसेच आरोपींनीही कॅफेमधून पळ काढला. या घटनेची माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक राऊत यांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. जखमी अविनाशला उत्तर अंबाझरी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला गोळीबार

सोशा कॅफेत सीसीटीव्ही असून कुख्यात लांजेवार आणि अविनाश यांच्यातील वाद विवाद या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर लांजेवारने पिस्तुलातून अंधाधुंद गोळीबार केल्याचेही फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहे.





Source link

चोक्सीला फरार घोषित करण्याची ईडीची याचिका सात वर्षांपासून प्रलंबित

0
चोक्सीला फरार घोषित करण्याची ईडीची याचिका सात वर्षांपासून प्रलंबित


मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीसाठी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील विशेष न्यायालयात केलेला अर्ज केल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे.

चोक्सी (६५) आणि त्याचा पुतण्या हिरे व्यापारी नीरव मोदी हे १३ हजार कोटी रुपयांच्या पीएनबी बँक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक केली. ईडीने जुलै २०१८ मध्ये चोक्सी याला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या तरतुदींनुसार फरारी घोषित करण्याची आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.

तथापि, ईडीच्या अर्जात प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा आरोप करणाऱ्या चोक्सी याने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंघक कायद्यांतंर्गत स्थापन (पीएमएलए) न्यायालय आणि उच्च न्यायालयात केलेल्या विविध अर्जांमुळे या प्रकरणाला वारंवार विलंब होत आहे.

फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीविरुद्ध १०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिकच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यासाठी वॉरंट बजावल्यास आणि त्या व्यक्तीने भारतातून पलायन केले असल्यास त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले जाऊ शकते. आरोपीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता तपास यंत्रणा जप्त करू शकते. केली जाऊ शकते.

दुसरीकडे, चोक्सी याने ईडीच्या अर्जाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ईडीने अर्ज दाखल करताना योग्य प्रक्रियेचे पालन केले नसल्याचा दावा चोक्सी याने याचिकेत केला होता. तथापि, सप्टेंबर २०२३ मध्ये, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि ईडीने फरारी आर्थिक कायद्याअंतर्गत विहित नियमांचे पालन केले होते, असे आदेशात नमूद केले होते.

असे असूनही, चोक्सीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याबाबतची सुनावणी सुरूच झालेली नाही आणि चोक्सी याने मात्र त्यांच्या वकिलांद्वारे विशेष न्यायालयात अर्ज दाखल करणे सुरू ठेवले असून त्याच्या अनेक याचिका फेटाळून लावल्या आहेत अथवा प्रलंबित आहेत. तसेच, त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या ईडीच्या अर्जावर बजावलेली नोटीस मागे घेण्याबाबतचा आणि त्याच्याविरोधातील ही कार्यवाही थांबवण्याबाबतचा चोक्सीचा अर्जही डिसेंबर २०२३ मध्ये फेटाळण्यात आला होता.





Source link

राज्यातील ‘स्मार्ट मीटर’ची माहिती देण्यास टाळाटाळ

0
राज्यातील ‘स्मार्ट मीटर’ची माहिती देण्यास टाळाटाळ



नागपूर : महावितरणकडून राज्यभरात जबरदस्ती ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावले जात आहेत. या मीटरविरोधात आंदोलनही सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या मीटरबाबत माहिती अधिकारात महावितरणकडून माहिती मागितली. परंतु, उत्तरात न मागितलेली ‘लेटर ऑफ अवार्ड’ची निवडक पाने पाठवून कायद्याची पायमल्ली झाल्याचा आरोप होत आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्ते अपिलात जाणार आहेत.

महावितरणकडून सध्या घरोघरी जाऊन ‘स्मार्ट मीटर’ लावले जात आहेत. यासंदर्भात कोलारकर यांनी महावितरणकडे मीटर लावण्याचे काम दिलेल्या संबंधित एजन्सीचे नाव, तिला सोपवलेली कामे, मीटर बदलण्याची कार्यपद्धती, ग्राहकाला पूर्वसूचना न देता परस्पर मीटर बदलण्याचे अधिकार असल्यास संबंधित पत्राची प्रत, एजन्सीच्या माणसांना महावितरणने ओळखपत्र पुरवले असल्यास त्याची माहिती, नियमांची प्रत, मीटर सक्तीने बदलवण्याचे आदेश असल्यास शासन आदेशाची प्रत मागितली.

महावितरणने माहिती अधिकार कायद्यानुसार उत्तर देण्याच्या नियमाचे पालनही केले नाही. उलट तीन ओळींच्या एका पत्रासोबत न मागितलेल्या ७ ऑगस्ट २०२३ रोजी मेसर्स मॉंटोकार्लो लिमि. अहमदाबाद, यांना महावितरण मुंबईने पाठवलेल्या ‘लेटर ऑफ अवार्ड’ची प्रत तसेच त्यासोबतच्या १ हजार ६४ पृष्ठांपैकी अधल्या मधल्या पृष्ठ १६५ ते १८३ या पानांच्या प्रती जोडून पाठवल्या आहेत. मागितली गेलेली माहिती रीतसर उपलब्ध करून न देता चालवलेली ही माहिती अधिकार कायद्याची थट्टा असल्याचा आरोप कोलाकर यांनी केला. संबंधित माहिती प्राप्त करून घेण्यासाठी अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील करणार असल्याचेही कोलारकर यांनी सांगितले.

महावितरणकडून माहिती अधिकार कायद्याचे पालन करून संबंधिताला नियमित माहिती दिली जाते. या प्रकरणाची अद्याप तक्रार नाही. प्रकरणाची माहिती घेऊन योग्य कारवाई करू.

दिलीप दोडके, मुख्य अभियंता, नागपूर.



Source link

ऑनलाइन वीज देयकांच्या पर्यायाला नकारघंटा!

0
ऑनलाइन वीज देयकांच्या पर्यायाला नकारघंटा!


पुणे : एकीकडे ‘डिजिटल इंडिया’चा डांगोरा पिटला जात असताना ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ या ऑनलाइन वीजबिल भरणा योजनेकडे मात्र राज्यभरातील वीजग्राहकांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. योजना सुरू झाल्यापासून सात वर्षांत राज्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत जेमतेम दीड टक्का ग्राहकच ‘गो ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्याचे ‘महावितरण’च्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

‘महावितरण’ला छापील कागदी वीज देयकांवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेतून महावितरणतर्फे ‘गो ग्रीन’ ही योजना २०१८मध्ये सुरू करण्यात आली. योजनेत नोंदणी केलेल्या ग्राहकांना कागदी वीजदेयकाऐवजी ई-मेल, लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) वीजदेयक पाठविण्यात येते. ‘महावितरण’ने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यभरातील सुमारे तीन कोटी लघुदाब वीजग्राहकांपैकी ५ लाख २ हजार ६५७ ग्राहकांनीच ‘गो-ग्रीन’ योजनेत नोंदणी केली आहे. आतापर्यंत योजनेत सहभागी ग्राहकांना प्रत्येक देयकामागे दहा रुपये सवलत देण्यात येत होती. मात्र, जानेवारीत घेतलेल्या निर्णयानुसार, आता योजनेला प्रतिसाद वाढवण्यासाठी योजनेत सहभागी ग्राहकाला पहिल्याच वीज देयकात बारा महिन्यांची एकरकमी म्हणजे १२० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘‘कॅशलेस इंडिया’चे धोरण आणणाऱ्या सरकारला वीज देयकाचा ऑनलाइन भरणा केल्यावर वीज खंडित होणार नाही, असा विश्वास वीज ग्राहकांना देता येत नाही. वीज देयक भरल्याचा पुरावा म्हणून छापील वीज देयक जपून ठेवण्याची सवय ग्राहकांमध्ये दिसते. त्यामुळे महावितरणने विश्वासार्हता वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे,’ असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे म्हणाले, ‘वीजदेयक ऑनलाइन भरण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये अजूनही निर्माण झालेली नाही. ग्रामीण भागात शिक्षण, दळणवळणाच्या साधनांची सोय नाही. कित्येक दिवस वीजही नसते. अशा परिस्थितीत ऑनलाइन वीज देयक स्वीकारण्याचा विश्वास ग्राहकांमध्ये नाही. त्याशिवाय, महावितरण देत असलेली सवलत तुटपुंजी असून, यंत्रणेतील दोषांमुळे सर्वसामान्य नागरिक छापील वीज देयकांवरच विश्वास ठेवतात. लघुसंदेश आलाच नाही, तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. तांत्रिक अडचणीमुळे वीज देयक भरले नाही, तर वीजपुरवठा खंडित होण्याची भीती ग्राहकांमध्ये दिसते.’

हेही वाचा

डिजिटल व्यवस्था अजूनही ग्रामीण भागात, ग्राहकांकडून तितकीशी वापरली जात नाही. मात्र, योजनेचा प्रतिसाद वाढवण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. आता दरमहा दहा रुपये सवलत देण्याऐवजी ग्राहकांना एकरकमी सवलत देण्यात येत आहे.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे विभाग, महावितरण —

दहा रुपयांच्या सवलतीपेक्षा यंत्रणेचा त्रास नको, अशी भावना ग्राहकांत आहे. लोकांचा यंत्रणेवरील विश्वास वाढण्यासाठी यंत्रणेतील दोष कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच ‘गो-ग्रीन’सारख्या योजना यशस्वी होतील.

अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ

‘गोग्रीन’मध्ये पुण्याची आघाडी

गो-ग्रीन योजनेला पुणे विभागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. पुणे विभागातील २ लाख ८०६ वीज ग्राहकांनी ‘गो ग्रीन’चा पर्याय निवडला आहे. कोकण विभागातील १ लाख ८३ हजार ३६८, नागपूर विभागातील ६३ हजार ३९९, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत कमी ५५ हजार ८४ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडला आहे.





Source link

Permeability of rocks loksatta article कुतूहल : खडकांची पारगम्यता

0
Permeability of rocks loksatta article कुतूहल : खडकांची पारगम्यता


एखाद्या खडकात भूजल अथवा पेट्रोलियम साठण्यासाठी तो खडक केवळ सच्छिद्र असणे पुरेसे नसते. तर त्या खडकातल्या पोकळ्यांमधून पाणी अथवा पेट्रोलियम इकडून तिकडे वहात जाणेही तितकेच गरजेचे असते. एखाद्या जलधारक खडकाच्या ठरावीक दाबाखाली पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेला त्याची पारगम्यता (परमिअॅबिलिटी) म्हणतात. खडकांमधील छिद्रांचा आकार आणि ती छिद्रे एकमेकांशी जोडलेली असण्याचे प्रमाण यावर त्या खडकाची पारगम्यता अवलंबून असते. छिद्रांचा आकार आणि त्यामधील पोकळ्यांचे आकारमान जितके जास्त असेल, तितकी त्या खडकाची पारगम्यता जास्त असते. सामान्यत: वाळूच्या कणांनी बनलेला वालुकाश्म (सँडस्टोन) जास्त सच्छिद्र आणि पारगम्य असतो. या उलट मृद्खनिजाच्या (क्ले) बारीक कणांनी बनलेल्या शेल या खडकात छिद्रे लहान असतात. त्यामुळे त्याची पारगम्यताही कमी असते. अग्निजन्य (इग्निअस) आणि रूपांतरित (मेटॅमॉर्फिक) खडक स्फटिकीभवन होऊन तयार होत असल्यामुळे त्यांची सच्छिद्रता आणि पारगम्यता खूपच कमी असते.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पारगम्यतेच्या मापनाचे एकक हे मीटर वर्ग असले, तरी व्यवहारात मात्र पारगम्यता डार्सी या एककात मोजली जाते. डार्सी नावाच्या फ्रेंच अभियंत्याने वाळूच्या गाळणीतून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोजला आणि भूजलवैज्ञानिक नियम मांडला. त्याला पुढे डार्सीचा नियम असे नाव पडले. खडकाची पारगम्यता ही केवळ भूजलविज्ञानातच नव्हे तर खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनात, तसेच ऊर्जा उद्याोगातदेखील अतिशय महत्त्वाची असते.

पारगम्यता वेगवेगळ्या पद्धतीने मोजली जाते. त्यानुसार तिचे काही प्रकार आहेत. परिपूर्ण पारगम्यता म्हणजेच शंभर टक्के संपृक्त अवस्थेत द्रव पदार्थ वाहून नेण्याची खडकाची क्षमता; तर प्रभावी पारगम्यता म्हणजे इतर द्रव्यांच्या तुलनेत तेल किंवा पाणी वाहून नेण्याची खडकाची क्षमता होय, तर अंशिक संपृक्त द्रवाची पारगम्यता व शंभर टक्के संपृक्त द्रवाची पारगम्यता यांच्यातील गुणोत्तर म्हणजे सापेक्ष पारगम्यता होय.

हेही वाचा

सच्छिद्रता आणि पारगम्यता हे खडकाचे भिन्न गुणधर्म आहेत. शेलसारखा एखादा खडक खूप सच्छिद्र असूनही त्याची पारगम्यता मात्र बरीच कमी असते. तसेच मृद्खनिजांची सच्छिद्रता १५ टक्के इतकी जास्त असूनही त्यांची पारगम्यता अतिशय कमी असते. अशा खडकांमधे पाण्याचा साठा होऊ शकतो, परंतु त्याचे वहन होऊ शकत नाही त्यामुळे तो साठा उपयोगात आणता येत नाही. त्यामुळे एखादा खडक हा जलधारक असूनही त्यातून पाणी मिळवता येत नाही. या कारणामुळे खडकाची वहनक्षमता हा त्याचा कळीचा गुणधर्म ठरतो.

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org





Source link

loksatta editorial on waqf amendment act violence in west Bengal अग्रलेख : ‘वक्फ’की कैद में…

0
loksatta editorial on waqf amendment act violence in west Bengal अग्रलेख : ‘वक्फ’की कैद में…


विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याइतका मुत्सद्दीपणा ममता बॅनर्जींकडे नाही. तो असता तर दंगल टळली असती…

काही राजकारणी आणि पक्ष जराही अपेक्षाभंग करत नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांचा तृणमूल आणि तेथील विरोधी पक्ष भाजप हे या अशांतील एक. वक्फ सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या आधिपत्याखालील पश्चिम बंगालात त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटेल आणि भाजप त्यावर रान उठवेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो ममताबाई आणि भाजप यांनी पूर्ण खरा ठरवला. या वक्फ कायद्यास काँग्रेसप्रमाणे ममता बॅनर्जी यांचा विरोध आहे. लोकशाहीत बहुमताचे चालते हे सत्य लक्षात घेतल्यास संसदेत सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे; त्यांनी त्याआधारे वक्फ विधेयक मंजूर करून घेतले हे सत्य ममताबाईंनी मान्य करायला हवे. त्यास त्या तयार नाहीत. आपल्याकडे प्रत्येक पक्ष आपापल्या ‘मतदारांस’ खूश करण्याचा प्रयत्न करतो. तथापि सतत मतदारांच्या खुशीचे राजकारण करण्याची सवय लागली की खूश करणे आणि लोकानुनय यांतील सूक्ष्म सीमारेषा दिसेनाशी होते. बराच काळ सत्ता उपभोगलेला काँग्रेस ही सीमारेषा विसरला आणि २०१४ साली सत्ता भाजपच्या हाती सोपवता झाला. आता तुष्टीकरणाची भाजपची पाळी. इतके दिवस काँग्रेस आणि डावीकडील पक्षांनी मतांसाठी अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण केले. त्या तुष्टीकरणाचा लंबक आता अल्पसंख्याकांकडून बहुसंख्याकवादाकडे झेपावणार हे ओघाने आलेच. वक्फ विधेयक मंजुरी हा त्याचाच एक भाग. ‘आधीच्या राजवटींनी इस्लाम धर्मीयांस ‘वक्फ’च्या नावाखाली अनावश्यक जमिनी बहाल केल्या; सबब हे लांगूलचालन आता थांबवायला हवे,’ ही भाजपने वक्फ विधेयकासाठी बहुसंख्याकांच्या मनी उतरवलेली कथा. ती बहुसंख्याकांस विश्वासार्ह का वाटते याचा विचार न करता ममतांच्या तृणमूल आणि अन्य पक्षीयांनी त्याविरोधात रान उठवले. वास्तविक मंगळवारी, १६ एप्रिल रोजी, या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तोपर्यंत सर्वांनीच धीर धरण्यास हरकत नव्हती. तथापि आपणच खरे अल्पसंख्याकांचे हितरक्षक हे सिद्ध करण्याची तृणमूल घाई आणि त्यांस बहुसंख्याकविरोधी ठरवण्यास हातघाईवर आलेला भाजप यांतून मुर्शिदाबाद परिसरात दंगल सुरू झाली. त्यात तीन जणांचे प्राण आणि अनेकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर ही दंगल काही प्रमाणात तिसऱ्या दिवशी जरा शमलेली दिसते. पण ही शांतता हंगामी ठरण्याचीच शक्यता अधिक.

कारण अवघ्या वर्षभरात पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत आणि ममता बॅनर्जी यांना हटवण्यासाठी एक नव्हे तर तीन तीन पक्ष उत्सुक आहेत. यात सगळ्यात आघाडीवर अर्थातच भाजप. गेल्या निवडणुकीतच आपण सत्ताधीश होऊ अशी अपेक्षा त्या पक्षास होती. परंतु खमक्या ममताबाईंनी ती हाणून पाडली. तेव्हा भाजपची अस्वस्थता समजून घ्यायला हवी. भाजपने काय नाही केले? दुर्गादेवींच्या प्रदेशात मारुतरायास मैदानात उतरवले, पक्ष फोडला, न फुटणाऱ्यांस तुरुंगात डांबले, न्यायाधीशांस निवडणुकीत उतरवले असे बरेच काही करूनही भाजपच्या हाती आपली निराशाच! ममताबाईंचे नाक वरच. ते भाजपला सहन होणे अवघड हे दिसत होते. परत केवळ भाजपच नव्हे तर एकेकाळचे सत्ताधीश डावे आणि सत्तासुख हरवून कित्येक दशके झालेला काँग्रेस हेही ममतांच्या पायउतारास उत्सुक. पण ममताबाई आणि त्यांचा तृणमूल काही त्यांना आनंद देईनात. तेव्हा मिळेल त्या मार्गाने आणि मिळेल त्या कारणाने त्या राज्यात अस्वस्थता कशी नांदेल असे प्रयत्न होणार हे उघड होते. अशावेळी खरे तर ममताबाईंनी अधिक जागरूक राहणे गरजेचे होते. आंदोलन, हिंसाचार होणार नाही यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून प्रशासन हाताळण्याची गरज होती. पण तो विवेक ममताबाईंनी दाखवला नाही. आपणास नाक खाजवून दाखवणाऱ्या विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याइतका मुत्सद्दीपणा त्यांच्या ठायी नाही याचे अनेक दाखले अलीकडच्या इतिहासात आढळतात. चिडवले म्हणून चिडणे नैसर्गिक. पण आपण चिडावे म्हणून चिडवणाऱ्या विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपणास सोयीचे तेव्हाच रागावणे यास शहाणपण लागते. ते त्यांच्या ठायी असल्याचा पुरावा नाही.

निदान मुर्शिदाबाद दंगलीतून तरी तो सिद्ध होत नाही. वक्फ विधेयकास विरोध असणे गैर नाही. पण त्या विरोधासाठी जमलेल्या जमावास हिंसाचारापासून रोखता न येणे हे मात्र खचितच गैर. असे गैरकृत्य पश्चिम बंगाल सरकारच्या नाकर्तेपणातून घडले हे अमान्य करता येणार नाही. आता या संदर्भात परस्पर विरोधी दावे केले जातील. भाजपचे नेते मुसलमानांनी सुरुवात केली आणि हिंदूंवर हल्ले केले असे म्हणतील तर तृणमूल नेत्यांस या हिंसाचारात मुसलमान बळी पडल्याचे सांगत त्यांचा पत्कर घ्यावा लागेल. तसे झाले तर पुन्हा एकदा तृणमूल हा विरोधी भाजपच्या जाळ्यात अडकणार. ममता बॅनर्जी यांना फक्त अल्पसंख्याकांचाच कळवळा आहे आणि त्यासाठी प्रसंगी सामान्य हिंदूंस वाऱ्यावर सोडण्यास त्या मागेपुढे पाहणार नाहीत, असा प्रचार भाजप करणार. काँग्रेस असो वा तृणमूल वा अन्य विरोधी पक्ष. त्यांस या पद्धतीने अडचणीत आणण्याचा सुलभ आणि खात्रीशीर मार्ग भाजपला गवसलेला आहे. या पक्षांवर अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा आरोप केला की झाले. तो नाकारला तर अल्पसंख्य नाराज होतात आणि तो सिद्ध झाला तर बहुसंख्य दुरावतात अशी ‘इकडे आड तिकडे विहीर’सारखी परिस्थिती. तीस सामोरे जात हे भाजप आव्हान पेलायचे तर ममताबाई आणि विरोधकांस किमान दोन बदल करावे लागतील.

हेही वाचा

पहिला मुद्दा खास ममताबाईंसाठी. तो म्हणजे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची शिकस्त करणे. भाजपची पराचा कावळा करण्याची अतुलनीय क्षमता लक्षात घेऊन अशी संधी त्या पक्षास मिळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेणे. हे सत्य जितके ममताबाईंना तितकेच कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनाही लागू होते. तूर्त ममताबाईंना ते प्रत्यक्षात आणावे लागेल. दुसरा मुद्दा हिंदू-मुसलमान वादांत न अडकणे. कोणत्याही समाजात कोणा एका धर्मीयांचे शंभर टक्के कधी बरोबर नसते आणि कोणी एक शंभर टक्के चुकीचा नसतो. प्रत्येक मुसलमान हा देशविरोधी असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न जितका चुकीचा तितकाच मुसलमानांची प्रत्येक बाब गोड मानून तीकडे काणाडोळा करण्याचा तृणमूल, काँग्रेस आदी पक्षांचा पवित्रा गैर. सध्या वादाची ठिणगी ज्यावरून पडली त्या वक्फ विधेयकावरील भूमिकांतूनही हा आपपरभाव दिसून येतो. इतिहासात वक्फचे वर्तन शंभर टक्के रास्त आणि अभ्रष्ट होते असे मुसलमानांतील शहाणेही म्हणणार नाहीत. तेव्हा तसे विरोधी पक्षांनी म्हणण्याचे कारण नाही. याचा अर्थ सत्ताधारी भाजपने आणलेले वक्फ विधेयक उत्तम आहे, असा अजिबात नाही. या विधेयकातील त्रुटींवर ‘‘वक्फ’ने किया…’ (४ एप्रिल ) या ‘लोकसत्ता’ संपादकीयात भाष्य होते. तेच मुद्दे आता सर्वोच्च न्यायालयात धसास लागतील. तेव्हा विरोधी पक्षीयांनी इतका आततायीपणा करण्याचे काहीच कारण नाही.

तसे करून आपण सत्ताधारी भाजपच्या सापळ्यात अडकतो आहोत हे या सर्वांस कळत नाही, हे आश्चर्य. वक्फचा मुद्दा किती ताणायचा याचे भान विरोधकांनी दाखवायला हवे. सत्ताधारी भाजपस तेच तर हवे आहे. तथापि आपल्या विरोधकास जे हवे ते मिळू न देणे हे राजकारण. ते करण्याची बौद्धिक धमक विरोधकांनी दाखवावी आणि (फरीदा खानम आणि शायर ़फय्याज़ हाशमी यांची क्षमा मागून) ‘वक्फ की कैद में जिंदगी है मगर…’ ही अवस्था टाळावी. दंगली आपोआप टळतील.





Source link

कोट्यवधी रुपयांच्या वेतनाची लूट करणारा बनावट शिक्षक घोटाळा कसा झाला?

0
कोट्यवधी रुपयांच्या वेतनाची लूट करणारा बनावट शिक्षक घोटाळा कसा झाला?



Maharashtra fake teacher scam looted crores of rupees in salaries what exactly happen विश्लेषण : कोट्यवधी रुपयांच्या वेतनाची लूट करणारा बनावट शिक्षक घोटाळा कसा झाला?





Source link

भिवंडी पालिकेत नागरी सुविधांसाठी क्युआर कोड, सात दिवसांत तक्रारी निकाली निघाली नाहीतर अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

0
भिवंडी पालिकेत नागरी सुविधांसाठी क्युआर कोड, सात दिवसांत तक्रारी निकाली निघाली नाहीतर अधिकाऱ्यांवर होणार कारवाई



commissioner anmol sagar introduces shared qr codes to improve bhiwandi nizampur civic services || भिवंडी पालिकेत नागरी सुविधांसाठी क्युआर कोड, सात दिवसांत तक्रारी निकाली निघाली नाहीतर अधिकाऱ्यांवर होणार कारवाई





Source link