Friday, June 26, 2026
Home Blog Page 3147

Satish Kaushik : चाहत्यांचं कॅलेंडर काळाच्या पडद्याआड; सतीश कौशिक यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

0
Satish Kaushik : चाहत्यांचं कॅलेंडर काळाच्या पडद्याआड; सतीश कौशिक यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार


सतीश कौशिक यांनी बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनही कौशिक यांनी केलेलं होतं. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, रिचा चड्ढा, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, आलिया भट यांच्यासह अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.



Source link

Mrs Undercover : राधिका आपटे दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत; ‘मिसेस अंडरकव्हर’ ओटीटीवर रिलीज होणार!

0
Mrs Undercover : राधिका आपटे दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत; ‘मिसेस अंडरकव्हर’ ओटीटीवर रिलीज होणार!


Mrs Undercover : राधिका आपटेने तिच्या आगामी चित्रपटाची ‘मिसेस अंडरकव्हर’ची घोषणा केली आहे. राधिका या चित्रपटात एका अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या लग्नाला मिळणार कांचन आजीची संमती! थाटामाटात पार पडणार विवाह सोहळा

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या लग्नाला मिळणार कांचन आजीची संमती! थाटामाटात पार पडणार विवाह सोहळा


मात्र, आता कांचन आजी सगळ्यांनाच एक मोठं सरप्राईज देणार आहे. अरुंधतीच्या लग्नसोहळ्यात कन्यादानाचे विधी सुरू असताना गुरुजी आप्पांसह कांचन आजीला देखील बोलवायला सांगतात. मात्र, कांचन येणार नाही, अरुंधतीचं कन्यादान मी एकटाच करणार असं आप्पा म्हणतात. इतक्यात कांचन आजी या लग्न सोहळ्यात येते आणि मी अरुंधतीचं , माझ्या मुलीचं कन्यादान करेन, असं म्हणते. हे ऐकून आता सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. देशमुख कुटुंबातील आणखी एक व्यक्ती आता या सोहळ्यात सहभागी होणार आहे.



Source link

सातारा : जिल्ह्याची सरासरी ऊस तोडणी 730 रुपयांवर | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीपासून सुरू झालेला गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा टोळ्यांची कमतरता व मजुरांकडून झालेली लूट यामुळे शेतकरी आणि कारखानदार दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. त्यात कारखान्यांनी ऊस तोडणी वाहतुकीत भरमसाट वाढ केल्याने एफआरपीवर ताण आला आहे. जिल्ह्यात सरासरी वाहतूक व तोडणीसाठी तब्बल 730 रुपये द्यावे लागत आहेत. त्यातच अनेक कारखान्यांचा उतारा आता 10 टक्क्यांच्या खाली आल्याने शेतकर्‍यांची झोळी फाटकीच राहणार की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यंदा देशात महागाईचा दर हा 7 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी महागल्या आहेत. मजुरीचे दर वाढल्याने कारखानदारांनी तोडणी व वाहतुकीच्या दरात वाढ केली आहे. यंदा मराठवाडा व विदर्भातून येणार्‍या टोळ्यांची संख्या कमी झाल्याने ऊस तोडीवरही याचा परिणाम झाला आहे. ज्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्या टोळ्यांनी कारखान्यांकडे भरमसाट पैशाची मागणी केली आहे. परिणामी, ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील काही कारखान्यांचा हाच दर 800 हून अधिक झाला आहे. तोडणी व वाहतूक वाढली असताना कारखान्यांचा साखर उतारा मात्र कमी झाला आहे. काही वर्षांपूर्वी 12 टक्के उतारा असणारे कारखाने आता 10 च्या आत आले आहेत. 10.25 बेसवर एफआरपीची रक्कम ही 3 हजार 50 रुपये आहे. त्याप्रमाणेच बहुतांश कारखाने दर देत आहेत.

ज्या कारखान्यांकडे इथेनॉल प्रोजेक्ट आहेत, त्या कारखान्यांचा 1 ते दीड टक्का रिकव्हरी लॉस होत आहे. मात्र, काहीच कारखाने इथेनॉलचे पैसे देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एफआरपी वाढूनही शेतकर्‍याची झोळी रिकामीच झाल्याचे चित्र आहे.

   ऊसदर नियंत्रण समिती कागदावरच…

  •  एफआरपी आणि ऊस तोडणी वाहतुकीचे दर ठरवण्यासाठी राज्य स्तरावर ऊस दर नियंत्रण समिती आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे ही समिती कागदावरच राहिली आहे. बैठक नसल्याने राज्य सरकारच याबाबत निर्णय घेत आहे.
  •   सरकारवर साखर कारखानदारांची लॉबी दबाव आणत असल्याने कारखानदारांच्या मर्जीनुसारच सर्व कारभार सुरू आहे. त्यामुळे एफआरपी कमी झाली काय आणि वाहतूक तोडणी वाढली काय याचा काडीमात्र फरक सरकारवर पडलेला नाही. शेतकर्‍यांना याचा त्रास होताना दुसरीकडे आंदोलनेही कमी झाल्याचे चित्र आहे.











Source link

Raundal: बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या ‘रौंदळ’ची हवा! प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादानंतर हिंदीतही प्रदर्शित होणार!

0
Raundal: बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या ‘रौंदळ’ची हवा! प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादानंतर हिंदीतही प्रदर्शित होणार!


Raundal Marathi Movie: ‘रौंदळ’ने रिलीजपूर्वीच सर्वांच्या मनात कुतूहल जागवलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच ‘रौंदळ’ पाहण्यासाठी गर्दी केली.



Source link

सातारा : मागण्यांचा ‘शिमगा’ अन् स्वप्नांची ‘होळी’ | पुढारी

0


पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  कोयना धरणाच्या निर्मितीला 60 वर्षांहून अधिकचा काळ लोटला. मात्र अद्यापही ज्या भूमिपुत्रांनी या धरणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्याच भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचा शंभर टक्के प्रश्न अद्यापही प्रलंबित ठेवण्यातच आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी धन्यता मानली. बैठका, घोषणा, आश्वासनांपलीकडे राज्यकर्त्यांकडून स्थानिक भूमिपुत्रांच्या पदरात काहीच पडत नाही. सातत्याने केवळ मोर्चे, उपोषणे, आंदोलने प्रकल्पग्रस्तांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. या पाठीमागचा इतिहास लक्षात घेता दुर्दैवाने शासनाकडून आजवर या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा ‘शिमगा ’ तर स्वप्नांची ‘होळी ’ झाली हेच स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. कोयना धरणाच्या निर्मितीतून स्थानिक भूमिपुत्रांनी या राज्याला भरभरून दिले, दुर्दैवाने त्याच भूमिपुत्रांच्या नशिबी उपेक्षाच कायम आहे. सध्याचे सरकार एकीकडे धडाधड निर्णय घेत असताना मग तितक्याच वेगाने कोयना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या समस्यांचा शंभर टक्के निपटारा का होत नाही ? हा देखील संशोधननाचा भाग आहे.
पाटण तालुका म्हंटले की भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, आपत्तीग्रस्त अशा चारही बाजूंनी नैसर्गिक व कृत्रिम संकटांचा सामना स्थानिकांना करावा लागतो. एका बाजूला भूकंप, अतिवृष्टी, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्ती तर जगाच्या पर्यावरण रक्षणासाठी याच स्थानिकांच्या मानगुटीवर कृत्रिम प्रकल्प बसविण्यात आले. यामध्ये कोयना अभयारण्य, पश्चिम घाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे तर स्थानिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे.

काही वर्षांपूर्वी येथे पर्यावरण पर्यटन व्यवसाय चांगलाच फुलत होता. त्यालाही राजकीय व नैसर्गिक ग्रहण लागले आणि तब्बल आठ वर्षांपासून कोयना जलाशयातील बोटिंग बंद झाले. त्यातच भूस्खलनामुळे मोठी हानी झाली असून स्थानिकांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने राज्य शासनाने याबाबत तातडीने व गांभीर्याने विचार करून प्राधान्याने कोयना प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त, भूमिपुत्रांच्या प्रश्नांना शंभर टक्के न्याय द्यावा. शासकीय नोकर्‍यात त्यांना सामावून घ्यावे, पुनर्वसन, नागरी सुविधा आणि यांच्यासाठी जे – जे शक्य आहे, ते – ते सर्व उपलब्ध करून द्यावे. कोयना प्रकल्पग्रस्तांनी देशासाठी जी कृतज्ञता दाखवली, त्या कृतज्ञतेचे ऋणी राहून त्यांना न्याय देण्यात यावा अशाच अपेक्षा स्थानिक भूमिपुत्रांमधून व्यक्त होत आहेत.

(क्रमशः)

मुख्यमंत्री सुपुत्र असल्याने न्याय मिळणार का ?

यापूर्वी पाटण तालुक्याचे सुपुत्र आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात स्थानिक कोयना प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांना शंभर टक्के न्यायाच्या अपेक्षा होत्या. सध्या जिल्ह्याचे सुपुत्र आमदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वरसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस निधी देत आहेत. त्याचवेळी कोयना धरण विभागातील जनतेलाही मुख्यमंत्री भूमिपुत्र असल्याने न्याय मिळेल अशी अपेक्षा लागून राहिली आहे.

The post सातारा : मागण्यांचा ‘शिमगा’ अन् स्वप्नांची ‘होळी’ appeared first on पुढारी.



Source link

Rang Maza Vegla: अखेर तो दिवस उजाडला! १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घरी परतणार!

0
Rang Maza Vegla: अखेर तो दिवस उजाडला! १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घरी परतणार!


दीपिका, कार्तिकी, दीपा आणि सौंदर्या इनामदार चौघी मिळून कार्तिकला आणण्यासाठी तुरुंगात जाणार आहेत. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. कार्तिक इनामदार कुणाचीही वाट न बघता निघून गेल्याचं त्यांना कळणार आहे. तर, कार्तिक घरी देखील परतलेला नाही, हे पाहून सगळ्यांनाच त्याची काळजी वाटणार आहे. तर, कार्तिकी यावेळी देखील दीपावर याच खापर फोडणार आहे. दीपामुळेच कार्तिक घरी आलेला नाही, हिने पुन्हा काहीतरी केलं असेल, अस कार्तिकी दीपाला म्हणणार आहे.



Source link

सातारा : तळमावले येथे वडिलांनीच चिरला अल्पवयीन मुलीच्या अर्भकाचा गळा | पुढारी

0









ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलीने अर्भकाला जन्म दिल्यानंतर ते रडल्याचा आवाज शेजारील लोकांना ऐकू जाईल व आपली बदनामी होईल या भीतीने संबंधित मुलीच्या वडिलांनी अर्भकाचा गळा चिरल्याचा मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. गळा चिरल्यानंतर पुनर्वसित घोटील (ता. पाटण) गावच्या परिसरात डोंगराकडेला नाल्यात अर्भकाचे शिर व धड टाकून देण्यात आले होते. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी संबंधित मुलीच्या वडिलांना गजाआड केले आहे.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळमावले विभागातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी 34 आठवड्यांची गरोदर असल्याची माहिती तळमावले परिसरातील एका हॉस्पिटलमधून पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्याची खातरजमा करून घेत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित मुलीची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि यावेळी त्या मुलीच्या पोटात गर्भच नसल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांनी सहकार्‍यांसह या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित पीडित मुलीस विश्वासात घेत तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी घरीच प्रसूती केली. त्यानंतर जन्माला आलेले अर्भक रडत असल्याने शेजार्‍यांना याबाबत काही समजायला नको म्हणून त्याचे तोंड दाबून शस्त्राने त्या अर्भकाचा गळा चिरून वडिलांनीच शीर धडावेगळे केल्याचे संबंधित मुलीने सांगितले. तसेच शीर व धड त्यांनी कोठेतरी टाकून दिले असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी संशयित वडिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी अर्भकाचे धड व शीर पुनर्वसित घोटील गावठाण परिसरात असणार्‍या डोंगरालगतच्या एका नाल्यात टाकून दिल्याचे सांगितले. तसेच हा प्रकार समोर येऊ नये, म्हणून नाल्यात पालापाचोळा टाकण्यात आला होता. या माहितीवरून पोलिसांनी शोध घेतला असता घटनास्थळावर शीर व धड मिळून आले. त्यानंतर याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी सहकार्‍यांसह ही कारवाई केली आहे.











Source link

Satish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली

0
Satish Kaushik Death: तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल! कलाकारांकडून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली


सतीश कौशिक यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, ‘मला माहिती आहे की, मृत्यू हे जगातील शेवटचे सत्य आहे. पण मी माझ्या जीवनात असा कधीच विचार केला नव्हता की, माझ्या जवळच्या मित्रासाठी कधी असे लिहावे लागेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागेल. सतीश तुझ्याशिवाय माझे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही.’



Source link

Shatir The Beginning : बॉलिवूड कलाकारांनाही मराठीची भुरळ! सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Shatir The Beginning : बॉलिवूड कलाकारांनाही मराठीची भुरळ! सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला


‘शातिर THE BEGINNING’ या चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेवर आधारित असून चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे. ‘शातिर THE BEGINNING’ या चित्रपटात मराठीतील आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसह काही नवोदित कलाकार सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी अद्याप कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे समोर येणार आहे.



Source link