Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2893

Kriti Sanon Birthday: इंजिनीअरिंग करून मनोरंजन विश्वात आली क्रिती सेनन; साऊथमधून केलं होतं पदार्पण!

0
Kriti Sanon Birthday: इंजिनीअरिंग करून मनोरंजन विश्वात आली क्रिती सेनन; साऊथमधून केलं होतं पदार्पण!

अभिनेत्री क्रिती सेननचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. तिचे वडील राहुल सेनन हे सीए आहेत. तर, तिची आई गीता सेनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. इतकंच नाही, तर क्रितीने स्वतः इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. तिने नोएडा येथील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. क्रिती सेनन एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील आहे. केवळ नृत्यचं नाही तर, क्रिती राज्यस्तरीय बॉक्सर देखील आहे. पण, नंतर तिने अचानक फिल्मी दुनियेत एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.

Source link

Maharashtra Rain : घराबाहेर पडणार असाल तर सावधान ! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट

0
Maharashtra Rain : घराबाहेर पडणार असाल तर सावधान ! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट तर रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज देण्यात आला आहे.

Source link

आज राज्यात कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट, काही भागात शाळांना सुट्टी; वाचा हवामान विभागाचा अंदाज

0
आज राज्यात कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट, काही भागात शाळांना सुट्टी; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर कुठं पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पाहुयात कुठं नेमकी काय स्थिती राहणार.

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज (गुरुवार दिनांक 27 जुलै 2023) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज अति मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी

मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्या तआली आहे.

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस

आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मागील आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. परिणामी नागरिक या उकाड्यामुळं हैराण झाले होते. सकाळपासून प्रखर उष्णतेचे चटके बसत असताना रात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, पावसाअभावी भात पिकाची लागवड खोळंबल्यानं चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून जिल्ह्यातील जनजीवनावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. रात्री 11 वाजता शासकीय अहवालानुसार जिल्ह्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे तर शास्त्री, बाव नदी, काजळी नदी आणि कोदवली या चार नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. आजही हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain Update : पावसाचा रेड अलर्ट…मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Ratnagiri : वाटद बंधाऱ्यात पोहायला गेलेले तीन जण बुडाले; दोघांचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

0
Ratnagiri : वाटद  बंधाऱ्यात पोहायला गेलेले तीन जण बुडाले; दोघांचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील गाव नदीवरील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या तीन तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर एकजण थोडक्यात बचावला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

Source link

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर केसरकर म्हणाले …. ते म्हणजे धरण नाही

0
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर  केसरकर म्हणाले …. ते म्हणजे धरण नाही

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर  केसरकर म्हणाले …. ते म्हणजे धरण नाही

Source link

Rain Alert : राज्यात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार! गुरुवारी ५ जिल्ह्यांना रेड तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0
Rain Alert : राज्यात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार! गुरुवारी ५ जिल्ह्यांना रेड तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

..या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट –

रेड अलर्ट असलेल्या पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Source link

Satara Leopard :सातारा जिल्ह्यातील वराडे गावात बिबट्याची दहशत

0

Satara Leopard :सातारा जिल्ह्यातील वराडे गावात बिबट्याची दहशत

Source link

Satara Kaas Dam: साताऱ्यात जोरदार पाऊस; कास धरण 100% भरलं

0

Satara Kaas Dam: साताऱ्यात जोरदार पाऊस; कास धरण 100% भरलं

Source link

नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून विधानसभेत आज पुन्हा गदारोळ

0
नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून विधानसभेत आज पुन्हा गदारोळ

Mumbai Nashik Highway Traffic:  नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवरून (Traffic Jam) विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांच्या उत्तरावर सभागृहाचे समाधान झाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदारांनी गोंधळ झालेला सुरुवात केली. आमदार जयकुमार रावल यांनी या विषयावर सभागृहातच चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर मंत्र्यांनी नोंद घेतो असे उत्तर दिले. त्यावर संतापलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरच परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक मुंबई वाहतूक कोंडीच्या संदर्भात सभागृहात आपण काल चर्चा केली. अध्यक्षांनी स्वतःही चर्चा गांभीर्यपूर्वक ऐकली त्यानंतर काही निर्देशही दिले. मात्र तरीही वाहतूक कोंडीच्या परिस्थितीत तसूभर ही फरक पडायला तयार नाही. थोरात यांनी सभागृहात शाळकरी मुलांसोबत घडलेली घटना विशद केली. ते म्हणाले दुपारी बारा वाजता वाहतूक कोंडीत अडकलेली लहान लहान शाळकरी मुले सायंकाळी पाच वाजता वाहतूक कोंडीतून बाहेर पडली. हे अत्यंत चुकीचे आणि गंभीर असल्याचे थोरात यांनी म्हटले.

संतप्त झालेले बाळासाहेब थोरात म्हणाले की, मंत्रीमहोदयांचे वाहतूक कोंडीबाबतचे गांभीर्य दिसले नाही. अध्यक्षांनी सूचना देऊनही, अंमलबजावणी झालेली नाही. मंत्री महोदयांनी या विषयाबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. ‘नोंद घेतली‘ किंवा ‘होय‘ अशी उत्तरे देऊन चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

भिवंडीत जुना आग्रा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

जुना आग्रा मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली. चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अनेक स्कूल बसदेखील अडकली होती. 30 मिनिटांचे अंतर कापण्यासाठी जवळपास तीन-तीन तास लागत होते. भिवंडी ते वसई आणि भिवंडी ते वाडा या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक वाहन जुना आग्रा मार्गाकडे वळली होती. मात्र, या मार्गावरही वाहतूक कोंडी दिसून आली.

भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. जळगाव धुळे अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबई मध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

इतर संबंधित बातम्या:

Source link