Tuesday, July 21, 2026
Home Blog Page 2775

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांकडून उपचार सुरू

0
Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांकडून उपचार सुरू


विदर्भात मिळतं, मग मराठवाड्यात का नाही?- जरांगे पाटील

विदर्भातील कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळतं, मग मराठवाड्यातील मराठ्यांना का मिळत नाही?, आरक्षण देणं हे सरकारच्या हातात आहे. सरकारचं ऐकून आम्ही अनेकदा आंदोलनं मागे घेतलेली आहे. मला कुणालाही दुखवायचं नाहीय. कुणालाही काही न बोलता मी शांततेत आंदोलन करणार आहे. आरक्षणाचा जीआर घेवून या, मी तातडीने उपोषण सोडेन, असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.



Source link

TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 6 सप्टेंबर 2023: ABP Majha

0
TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 6 सप्टेंबर 2023: ABP Majha



<p>TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 6 सप्टेंबर 2023: ABP Majha</p>



Source link

कराडमध्ये 200 गावे करणार चक्री उपोषण | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी सर्व दोषी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित न करता त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी कराड तालुक्यातील सर्व दोनशे गावे 13 सप्टेंबरपासून चक्री उपोषण सुरू करणार आहेत. त्याचबरोबर पोलिस अधिकार्‍यांवर आठवडाभरात बडतर्फीची कारवाई न झाल्यास वेळप्रसंगी आमरण उपोषण सुरू केले जाणार असल्याचा इशारा कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून तालुक्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव एकच असून राज्य शासन केवळ ठराविक विभागातील समाज बांधवांना आरक्षण देत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. शासनाची ही भूमिका संतापजनक असून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र सर्वच राजकीय पक्षांचे नेते ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत एकही शब्द बोलत नाहीत. मराठा समाज बांधव शेतकरी म्हणजेच कुणबी आहे आणि त्यामुळेच आरक्षण मिळणे, हा हक्क आहे.

त्यामुळे हा हक्क मिळवण्यासाठी 13 सप्टेंबरपासून कराडमध्ये मराठा समाज बांधव उपोषण सुरू करणार आहेत. हे उपोषण चक्री राहणार असून तालुक्यातील एक गाव दररोज उपोषणास्थळी उपस्थित राहून राज्य शासनाचा निषेध नोंदवणार आहेत. कराड तालुक्यात दोनशे गावे असून ही सर्व गावे जवळपास सहा महिने उपोषण सुरू ठेवणार आहेत. त्याचवेळी जालना घटनेस जबाबदार असणार्‍या सर्व दोषी पोलिस अधिकार्‍यांना सेवेतून निलंबित न करता त्यांच्यावर शासनाने बडतर्फीची कारवाई केली पाहिजे, अशी मराठा समाजाची भावना आहे.

वेळप्रसंगी काही समाज बांधव आमरण उपोषण ही सुरू करणार आहेत. त्यामुळे शासनाने आठवडाभरात बडतर्फीची कारवाई न केल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असा इशाराही या बैठकीत मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.

‘आरपीआय’, ‘हिंदू एकता’चा पाठिंबा 

कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाची बैठक सुरू असतानाच रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी बैठकीस उपस्थिती लावली. मराठा समाज बांधवांनी मतदानाचा अधिकार बजावत आरक्षण न देणार्‍यांना बाजूला करावे, असे आवाहन करत अशोकराव गायकवाड यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला. तसेच हिंदू एकता आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीस उपस्थित राहून मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवला.











Source link

Jawan: पहिल्याच दिवशी होणार ‘जवान’ची छप्परफाड कमाई! अ‍ॅडव्हांस बुकिंगला मिळालाय जोरदार प्रतिसाद

0
Jawan: पहिल्याच दिवशी होणार ‘जवान’ची छप्परफाड कमाई! अ‍ॅडव्हांस बुकिंगला मिळालाय जोरदार प्रतिसाद


मीडिया रिपोर्टनुसार, ‘जवान’ची ७ लाखांहून अधिक तिकिटे अ‍ॅडव्हांस बुकिंगमध्ये विकली गेली आहेत. या चित्रपटाने अ‍ॅडव्हांस बुकिंगच्या ३ दिवसात सुमारे २१.१४ कोटी रुपये कमावले आहेत. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारख्या अभिनेत्रीही झळकणार आहेत. दीपिका पदुकोण, विजय सेतुपती हे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत.



Source link

सातारा : खुनातील संशयित 8 महिन्यांनी सापडला | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरालगत पोलिस पत्नीने सुपारी देऊन पतीचा खून केलेल्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. 8 महिन्यानंतर एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अजून एकजण पसारच आहे. अमित ऊर्फ हिरो शिवाजी जाधव (वय 25, रा. रविवार पेठ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

दि. 24 जानेवारी रोजी मध्यरात्री अमित आबासाहेब भोसले (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचा अज्ञातांनी दुचाकीवर येऊन गोळीबार करुन धारदार शस्त्राने गळा चिरत खून केला. घटनेवेळी अमित भोसले हा एका महिलेसोबत कारमध्ये जेवण करत बसला होता. हात धुण्यासाठी कारमधून उतरल्यानंतर टपून बसलेल्या टोळक्याने अमित यांचा खून केला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सुरु झाल्यानंतर एक-एक धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यानुसार या गुन्ह्यात आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे. महिला पोलिसाने पतीचा सुपारी देऊन खून केल्याने पोलिस दलासह राज्यात खळबळ उडाली होती.

खुनाच्या या घटनेनंतर आणखी दोघेजण पसार झाले होते. पोलिसांनी जंग-जंग पछाडल्यानंतरही संशयित हातावर तुरी देत होते. दि. 31 ऑगस्ट रोजी या खून प्रकरणात एका संशयिताची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित अमित जाधव याला दहिवडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.











Source link

शिरवळच्या ‘एके’ टोळीला ‘मोका’ | पुढारी

0


शिरवळ परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर कारवाई

सातारा/शिरवळ, पुढारी वृत्तसेवा : शिरवळ (ता. खंडाळा) परिसरात दहशत माजवून खुनाचा प्रयत्नासारखे गुन्हे दाखल असलेल्या टोळीवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळीला गुन्हेगारी जगतात ‘एके’ या नावाने ओळखले जाते. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केलेल्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

आतिष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय 21), विशाल शेखर वाडेकर (वय 20), रामा दादा मंडलिक (वय 21, तिघे रा. शिरवळ), संजय विजय कोळी (वय 20, रा. खंडाळा सर्व ता. खंडाळा) अशी मोक्का लागलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, या टोळीवर नुकताच एक गुन्हा दाखल झालेला आहे. तक्रारदारांना संशयितांच्या टोळीने मोटारसायकलवरुन कट मारल्याचा जाब विचारला याचा राग होता. यावेळी आतिष ऊर्फ बाबू कांबळे याने शिवीगाळ करत तलवारीसारख्या हत्याराने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

शिरवळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता या टोळीने दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्याकरता संघटीतपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोनि नवनाथ मदने यांनी या टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली. संशयितांवर जुलूम व जबरदस्ती करून हिंसाचाराची धमकी देऊन अन्य अवैध मार्गाने दहशत व बळाचा वारंवार वापर केला असल्याचे समोर आले.

तसेच गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी व जबरी चोरीसाठी गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानुसार मोक्काचा प्रस्ताव तयार करुन तो सातारा पोलीस अधीक्षक तेथून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला असता त्यांनी त्याला मान्यता दिली. याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस करत आहेत.

The post शिरवळच्या ‘एके’ टोळीला ‘मोका’ appeared first on पुढारी.



Source link

कराड पोलिसांनी एक किलो गांजा पकडला | पुढारी

0


कराड, पुढारी वृत्तसेवा : कराड शहर व परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच कराडच्या बुधवारपेठेत 1 किलो गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या या कारवाईत 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांनी संशयितस ताब्यात घेतले आहे.

गणेश संजय वायदंडे (रा. बुधवारपेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरात एक संशयित पांढर्‍या रंगाच्या मोपेडवरून लोकांना गांजा पुरवत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कराड शहर व परिसरात सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान, रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी कृष्णा नाका परिसरात संशयित युवक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अलर्ट झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, पोलीस हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, रईस सय्यद, सोनाली पिसाळ या पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली. गाडीचीची तपासणी केली असता त्यामध्ये एक किलो गांजाचा साठा आढळून आला.

पोलिसांनी गाडीसह संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईचे पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले. संशयित वायदंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या परिसरात आणखी काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.



Source link

KBC 15: पंजाबच्या जसकरणची ७ कोटी जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली! तुम्हाला माहितीये का याचे उत्तर?

0
KBC 15: पंजाबच्या जसकरणची ७ कोटी जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली! तुम्हाला माहितीये का याचे उत्तर?


KBC 15 Latest Episode: पंजाबचा जसकरण सिंह क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १५चा पहिला करोडपती बनला. पण, त्याचे ७ कोटी जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.



Source link

डोंगर दर्‍यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात | पुढारी

0


गणेशचंद्र पिसाळ

पाटण : पाटण तालुक्यात शिक्षण क्षेत्रात राजकारण घुसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे पहायला मिळत आहे. गावागावांत गटातटाच्या राजकारणामुळे भावी पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. डोंगर कपारीत राहणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून जनावरे संभाळण्याचा पर्याय स्वीकारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कराटे येथील जिल्हा परिषद शाळा त्यातीलच एक.

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे काही प्राथमिक शाळांची दयनिय अवस्था झाली आहे. परिस्थिती सुधारली गेली नाही तर कराटे प्राथमिक शाळेप्रमाणे अन्य प्राथमिक शाळांना स्थानिक टाळे ठोकतील, अशी परिस्थिती आहे.

जग चंद्रावर आणि पाटण तालुक्यातील भावी पिढी जनावरांच्या पाठीमागे डोंगरावर, अशी अवस्था भविष्यात येथे पहायला मिळाली तर याला सर्वस्वी शिक्षण विभाग जबाबदार असेल असे भीषण वास्तव सध्या अनुभवायला मिळत आहे.

तालुक्यात कोयना विभागातील कराटे प्राथमिक शाळेला शिक्षकांअभावी शैक्षणिक धोरणांच्या विरोधात स्थानिकांनी शाळेलाच टाळे ठोकले. वर्षानुवर्षे स्थानिक शिक्षकाची गैरहजेरी, उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांची कमी झालेली पटसंख्या, शाळा सोडून अन्य शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाळाच बंद पडतेय की काय अशी परिस्थिती आहे.

तालुक्यातील शैक्षणिक वातावरण दूषित झाले आहे. कराटे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. उपशिक्षक पाच वर्षापासून गैरहजर आहेत. लोकसहभातून लाखो रुपये खर्च करून शाळा उभारण्यात आली मात्र तेथे शिक्षकच नाहीत. एक शिक्षक गैरहजर असताना शासनाचा पगार घेतो. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभाग त्यालाच पाठीशी घालत आहे, असे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.

दुसरा शिक्षक अधिकार्‍यांचे ऐकत नाही. 2018 पासून ग्रामस्थांच्या मागणीला अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांपर्यंत पाठपुरावा केला गेला पण काही उपयोग झाला नाही. 4 शिक्षकांची शाळा एका शिक्षकावर चालते. 95 पटसंख्या असणारी शाळा 55 पर्यंत खाली आली. पुढील वर्षी आणखी गळती वाढत जाईल. एका शिक्षकासाठी 90 मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावले जाते.

एका महिन्यात दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटूनही ग्रामस्थ भेटलेच नाहीत असे अधिकारी चुकीचे सांगत आहेत. यामुळे स्थानिकांचा अधिकार्‍यांवरील विश्वास उडाला आहे.

तालुक्यातील शैक्षणिक वातावरण खराब…

ऑनलाइनवरून संबंधित शिक्षक जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शाळेचे टाळे काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर शाळेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा कराटे ग्रामस्थांनी दिला आहे. अधिकारी शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पुढार्‍यांकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. शिक्षण क्षेत्रातील अशा अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील शैक्षणिक वातावरण खराब झाले आहे.



Source link

Krishna Janmashtami: कुणाला मिळालं कृष्णाचं नाव, तर कुणी गाठला शेवटचा थर! कलाकारांनी सांगितल्या दहीहंडीच्या आठवणी!

0
Krishna Janmashtami: कुणाला मिळालं कृष्णाचं नाव, तर कुणी गाठला शेवटचा थर! कलाकारांनी सांगितल्या दहीहंडीच्या आठवणी!


आयुष संजीव (वेदांत वानखेडे-३६ गुणी जोडी)

’३६ गुणी जोडी’ मालिकेतील ‘वेदांत’ अर्थात अभिनेता आयुष संजीव याने आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, ‘मी माटुंग्याला असतांना कृष्ण जन्माष्टमीचा, तसेच दहीहंडीचा थरार अनुभवला आहे. आम्ही सगळे सवंगडी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने दहीहंडी फ़ोडायचो. एकदा तर मला प्रत्यक्ष शेवटच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायला मिळाली होती. तो फार अविस्मरणीय असा क्षण होता. मी आजही त्या क्षणाने इतका भारवलेलो आहे. माझी एक मनापासूनची इच्छा आहे की, बॉलिवूडमध्ये मला संधी मिळाली, तर प्रथम दहीहंडी फोडण्याचा प्रसंग किंवा गाणे चित्रित करायला मिळावे. अजून एक छानशी आठवण म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा बदलापूरला राहायला गेलो, तेव्हा तिकडे दहीहंडी फारशी कोणी साजरी करत नव्हते. त्यावेळी आम्हा दोघा भावंडांचा फारच हिरमोड झाला. मात्र, त्यावेळी आमच्या आईने घरामध्येच एक सुंदरशी दहीहंडी तयार करून आमची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी माझ्या छोट्या भावाला कृष्ण बनवण्यात आले होते. आयुष्यात ही गोष्ट एक मखमली आठवण म्हणून कायम लक्षात राहील.’



Source link