Tuesday, July 21, 2026
Home Blog Page 2773

Maratha Reservation : हैदराबादच्या निजामकाळात नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

0
Maratha Reservation : हैदराबादच्या निजामकाळात नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा


Eknath shinde : तीन पिढ्यांच्या आधीचे कुणबी रेकॉर्ड्स असलेल्यांना सरकार कुणबी म्हणून मान्यता देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 



Source link

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदणीची तपासणी युद्धपातळीवर सुरु, जुन्या नोंदींची तपासणी

0
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदणीची तपासणी युद्धपातळीवर सुरु, जुन्या नोंदींची तपासणी


हिंगोली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी राज्य सरकार (Maharashtra Government) कमालीचं ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजातील (Maratha Reservation) नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्यासाठी राज्य सरकार विचाराधीन असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी मराठवाड्यातील मराठा नागरिकांच्या जुन्या नोंदणी तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महसूल विभाग त्याचबरोबर शिक्षण विभागातील जुन्या नोंदीमध्ये कुणबी जातीचा कुठे उल्लेख आहे का, याची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. 

कुणबी नोंदणीची तपासणी युद्धपातळीवर

यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या महसूल आणि शैक्षणिक नोंदी तपासल्या जात आहेत. निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी निजाम काळ झालेले राष्ट्रीय करार दस्तावेज आणि इतर कागदपत्रे त्याचबरोबर मराठा समाजातील लोकांची वंशावळ या सोबतच हक्क नोंदणी खासर प्रमाणपत्र नोंदणीवर कुणबी जातीचा उल्लेख आहे का याची तपासणी केली जात आहे.

कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अहवाल आठ दिवसात द्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश

 

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला अहवाल आठ दिवसाच्या आत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. या समितीला आधी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे हे उपोषण मागे घेत नसल्यामुळे आता ही मुदत आठ दिवसांवर आणण्यात आली आहे. 

जरांगे यांचं आमरण उपोषण सुरुच

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.

मराठा आरक्षणासाठी टॉवरवर चढून आंदोलन

जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे मराठा आंदोलकांनी चक्क टावर चढून आंदोलन केलं आहे. तसेच राज्य सरकारचे विरोधात घोषणाबाजी करून जरांगे पाटलांना आम्ही एकटे सोडणार नाही, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत प्राणाची आहुती देऊ मात्र, माघार घेणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी अनेक आंदोलन टेलिकॉम कंपनीच्या टॉवरवर चढले आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली उतरणार नसल्याची भूमिका सुद्धा आंदोलकांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.



Source link

Jawan: ‘जवान’साठी महेश बाबूने केले ट्वीट, शाहरुखने दिली प्रतिक्रिया…

0
Jawan: ‘जवान’साठी महेश बाबूने केले ट्वीट, शाहरुखने दिली प्रतिक्रिया…


महेश बाबूने ‘आता जवानची वेळ आली आहे. शाहरुख खानची क्रेझ आणि ताकद आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण टीमला जवान हा चित्रपट यशस्वीरीत्या ब्लॉकबस्टर होण्यासाठी शुभेच्छा. मी हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासाठी उत्सुक आहे’ या आशयाचे ट्वीट केले आहे. महेश बाबूने या ट्वीटमध्ये शाहरुख, विजय सेतुपती, एटली आणि रेड चिलीजला टॅग केले आहे. सोशल मीडियावर हे ट्वीट व्हायरल होताच शाहरुखने रिट्वीट केले आहे.



Source link

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहाताच आई-वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहाताच आई-वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…


पुढे तेजश्रीची आई म्हणाली की, “आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.तिची ‘अग्गबाई सासूबाईमधली तिची भूमिका फार आवडली. माझे असे नेहमी म्हणणे असते की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, सहन करत राहू नये. ती तिची भूमिका तशी होती. तर या मालिकेतही पुढे तशीच होताना दिसेल. आजच तिचे हे काम पाहिले आहे आणि आवडलं आहे मला. बघू आता मालिकेत पुढे काय होतंय.”



Source link

Pune Dahi Handi 2023 : पुण्यात दहीहंडी उत्सवाला वेळेचं बंधन, ‘या’ वेळेपर्यंतच डॉल्बीचा दणदणाट

0
Pune Dahi Handi 2023 : पुण्यात दहीहंडी उत्सवाला वेळेचं बंधन, ‘या’ वेळेपर्यंतच डॉल्बीचा दणदणाट


पुण्यात प्रत्येक चौकाचौकात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष दिसून येतो. पुण्यातील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू हे पुण्यातील मोठे दहीहंडी मंडळं आहेत. त्याशिवाय पुण्यातील विविध चौकात अनेक कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.



Source link

Shahrukh Khan: शाहरुख खानच्या मॅनेजरचा महिन्याचा पगार माहितीये का? वाचून बसेल धक्का

0
Shahrukh Khan: शाहरुख खानच्या मॅनेजरचा महिन्याचा पगार माहितीये का? वाचून बसेल धक्का


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. शाहरुखचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सातासमुद्रापार त्याचे चाहते पाहायला मिळतात. सोशल मीडियावर शाहरुखला लाखो लोक फॉलो करतात. पण, शाहरुख मात्र केवळ ६ लोकांना फॉलो करतो. त्यामध्ये शाहरुखचे कुटुंबीय आणि मॅनेजर पूजा दादलानी देखील आहे. शाहरुख त्याच्या मॅनेजरला किती पगार देत असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया शाहरुखच्या मॅनेजरची सॅलरी…



Source link

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक

0
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक


जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील वातावरण तापले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील जालना जिल्ह्यात पोलीस आंदोलकांमध्ये राडा पाहायला मिळाला. तर अजूनही जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आंदोलन केलच जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत जालना जिल्ह्यात उद्योग, व्यापारासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था तसेच जनजीवन पूर्ववत होण्यासह शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक, सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना, जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून शैक्षणिक नोंदी, खासरा प्रमाणपत्र तसेच निजामकालीन दाखले मागविले होते. तरी 1960 पूर्वीचे कागदपत्रे शोधून ती शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशांतता पसरविणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवली जाईल. जिल्ह्यात आज शांततेचे वातावरण असून ते अबाधित राहण्यासाठी सर्वांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तर यावेळी बोलतांना पोलिस अधिक्षक बलकवडे म्हणाले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. अंतरवाली सराटी येथील अनुचित प्रकाराचा पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे तपास करण्यात येऊन दोषीविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात कालपर्यंत केवळ 162 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आलेली कलमे कमी करण्याचे अधिकार असून चार्जशिट दाखल करतेवेळी कमी करण्यात येतील.  

नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा

तरुणांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रफितीवर विश्वास ठेवू नये. तसेच फॉरवर्ड करु नये. लाठीचार्जप्रकरणी अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे पारदर्शकपणे तपास करुन चौकशी करत आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा. खरे गुन्हेगार शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांकडे असलेले पुरावे, जबाब, साक्षीदार तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिस अधिक्षक कार्यालयातील विशेष कक्षात जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलन दरम्यान ज्या व्यक्तींनी हिंसा केली त्यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करावी तसेच निरपराध लोकांवरील गंभीर स्वरुपात दाखल गुन्हे मागे घ्यावेत व अनुचित प्रकारची नि:ष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशा सूचना केल्या.  बैठकीस सकल मराठा समाजाचे नागरिक, सदस्य, पदाधिकारी, महिला उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस, शरीरातील पाणी पातळी  कमी झाल्यानं सलाईन  लावण्याचा डॉक्टरांचा निर्णय 



Source link

Thank You For Coming trailer: सेक्स, ऑरगॅजमवर आधारित भूमी पेडणेकरच्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

0
Thank You For Coming trailer: सेक्स, ऑरगॅजमवर आधारित भूमी पेडणेकरच्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित


बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने १० ऑगस्ट रोजी या चित्रपटाची घोषणा केली होती. आता चित्रपटाचा ट्रेलर पाहाता सर्वांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रियाने यापूर्वी वीरे दी वेडिंग या चित्रपट केला होता. आता ‘थँक्यू फॉर कमिंग’ हा तिचा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात डॉली सिंह, कुशा कपिला, शिबानी बेदी, प्रधुम्न सिंह मॉल, नताशा रस्तोगी, गौतमिक, सुशांत दिवगिकर, सलोनी दैनी, डॉली अहलूवालिया, करण कुंद्रा आणि अनिल कपूर हे कलाकार देखील दिसणार आहेत. ६ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: विशाखा बांधणार का अनिरुद्धला राखी? काय घडणार आजच्या भागात जाणून घ्या

0
Aai Kuthe Kay Karte: विशाखा बांधणार का अनिरुद्धला राखी? काय घडणार आजच्या भागात जाणून घ्या


अनिरुद्ध म्हणाला की, “माझा राग, माझी चिडचिड तुम्हा सगळ्यांना दिसते. पण माझी माया दिसत नाही किंवा ती दाखवता येत नाही. आणि त्यामुळेच माझी जवळची, प्रेमाची माणसं माझ्यापासून दूरावली आहेत. पण माझ्या बहिणीच्या बाबतीत असे होऊ नसे असे मला सतत वाटते. म्हणून मी तुला (केदारला) माफ करतो. माझ्या बहिणीच्या आनंदासाठी मी काहीही करु शकतो. संजना तू म्हणतेस ना दर वेळेला माझा इगो आड येतो तर ते तसं नाहीये. माझ्यासाठी माझे हे कुटुंब महत्त्वाचे आहे.”



Source link

Tharla Tar Mag: चैतन्य करणांर मोठी चूक; साक्षीसमोर उघड होणार का अर्जुनचा प्लॅन? मालिकेत ट्वीस्ट

0
Tharla Tar Mag: चैतन्य करणांर मोठी चूक; साक्षीसमोर उघड होणार का अर्जुनचा प्लॅन? मालिकेत ट्वीस्ट


साक्षी चैतन्यला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून आश्रमाचा आराखडा काढून घेते. चैतन्य जेव्हा पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होतो, तेव्हा साक्षी आणि महिपत त्याच्याकडून या केसची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. आता यामुळे अर्जुन कोर्टात नेमके काय प्रश्न विचारू शकतो, याचा अंदाज त्यांना येणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.



Source link