Thursday, July 9, 2026
Home Blog Page 185

सकाळी उठताच दिसतात पोटाच्या कर्करोगाची लक्षणं; वेळीच सावध व्हा अनथा…

0
सकाळी उठताच दिसतात पोटाच्या कर्करोगाची लक्षणं; वेळीच सावध व्हा अनथा…


कर्करोग हा एक अतिशय गंभीर आजार असून दरवर्षी लाखो लोक कर्करोगामुळे आपले प्राण गमावत आहेत. बदलेली आणि खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या पिण्याचा सवयींमुळे गेल्या काही काळामध्ये कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढलेला दिसून आला आहे. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कर्करोग हा रोग ना श्रीमंत ना गरीब कोणालाही होऊ शकतो. कर्करोगाच्या विळख्यातून कोणीही वाचू शकत नाही. पोटाचा कर्करोग असल्यास शरीरात सकाळी उठल्यावर काही लक्षणं दिसतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास तुम्ही कर्करोगावर मात करु शकतात. 

सकाळी उठल्यावर दिसतात ही लक्षणं!

जर पोटाचा कर्करोग असेल तर सकाळी काही लक्षणं दिसतात. बाथरूमला जाण्यापूर्वी तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणं दररोज जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे. 

सकाळी पोटदुखी 

सकाळी तीव्र पोटदुखी हे पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला दररोज सकाळी पोटदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांना भेटा. 

स्टूलमध्ये रक्त येणे 

जर शौचास जाताना रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

जलद वजन कमी होतं

जर तुमचे वजन कोणत्याही डाएट आणि वर्कआउटशिवाय झपाट्याने कमी होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

पोटात गॅस तयार होणे

जर तुम्हाला पोटात गॅस तयार होण्याची समस्या वारंवार होत असेल तर ते पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतं. जर तुम्हाला सतत पोट फुगणे आणि गॅस तयार होण्याच्या समस्येने त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जा. 

भूक न लागणे 

पोटात कर्करोग झाला की भूक कमी होऊ लागते. जर तुमची भूक कमी झाली असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही डॉक्टरकडे जावे. 

ट्यूमर वेगाने पसरतो 

पोटाचा कर्करोग खूप वेगाने पसरतो. पोटाचा ट्यूमर संपूर्ण शरीरात वेगाने पसरतो. पोटाचा कर्करोग रोखण्यासाठी, मद्यपान आणि धूम्रपान टाळा. जंक फूड आणि फास्ट फूड शक्य तितके कमी प्रमाणात खा. कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

21 दिवस नाभीत तेल टाकल्याने काय होतं?; डॉक्टरांनी सांगितलं कोणते तेल लावावे?

0
21 दिवस नाभीत तेल टाकल्याने काय होतं?; डॉक्टरांनी सांगितलं कोणते तेल लावावे?


Oil in Your Navel Benefits : शरीरातील अनेक अवयवाचे अनेक वेगवेगळे काम असतात. अनेकांना प्रश्न पडतो नाभी आपल्या शरीरासाठी का महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की, नाभीला तेल लावल्याने शरीरातील लहान मोठ्या आरोग्याचा समस्या दूर होण्यास मदत मिळते. आयुर्वेदात याला नाभी चिकित्सा किंवा पेचोटी विधी असं संबोधलं जातं. नाभी चिकित्सा ही एक खूप जुनी आणि प्रभावी पद्धत मानली जाते. या विधीमध्ये नाभीमध्ये तेलाचे काही थेंब टाकले जातात आणि हलका मालिश करण्यात येतं. आयुर्वेदानुसार, नाभी आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे, जो शरीराच्या 72,000 नसांशी जोडला गेला आहे. अशा परिस्थितीत, नाभीत तेल लावल्याने कोणते फायदे मिळतात जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

नाभीत तेल लावण्याचे फायदे

योगगुरू हंसा योगेंद्र, ज्यांना डॉ. हंसाजी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, योगगुरूंनी सलग 21 दिवस दररोज रात्री नाभीत तेल लावल्याने कोणते फायदे होतात हे सांगितलं आहे. डॉ. हंसा योगेंद्र म्हणतात, तुम्ही या नियमाचं पालन केल्या एकाच वेळी अनेक समस्यांपासून आराम मिळतो, असं त्यांनी म्हटलंय. चला पाहूयात कोणते फायदे होतात ते. 

पचन सुधारते

नाभीच्या खाली एक ‘अग्नि केंद्र’ असते जे पचन आणि मूत्रसंस्थेचे नियंत्रण करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अपचन, गॅस, आम्लता यासारख्या समस्यांनी त्रास होत असेल, तर नारळाच्या तेलात आले आणि पुदिन्याचे आवश्यक तेलाचे काही थेंब मिसळा आणि नाभीवर लावा. 21 दिवस असे केल्याने तुमची पचनक्रिया सुधारू शकते. 

त्वचा उजळवते

दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीत नारळ किंवा बदामाचे तेल लावल्याने शरीर आतून हायड्रेट होते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.

हार्मोन्स संतुलित होतात

नाभीला कोमट एरंडेल तेल लावल्याने हार्मोन्स संतुलित होतात आणि मासिक पाळीच्या वेदना देखील कमी होतात.

दृष्टी सुधारते

सलग 21 दिवस नाभीमध्ये गायीचे तूप किंवा तीळाचे तेल टाकल्याने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि दृष्टी सुधारते.

ताण कमी करणे आणि झोप सुधारणे

लैव्हेंडर किंवा कॅमोमाइल तेलाने नाभीची मालिश केल्याने ताण कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते.

शरीर स्वच्छ करणे 

नाभीमध्ये कडुलिंब किंवा एरंडेल तेल लावल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि यकृत निरोगी राहते.

नाभीत तेल लावण्याची योग्य पद्धत काय?

डॉ. हंसाजी तुमच्या गरजेनुसार तेल निवडण्याचा सल्ला देतात. यानंतर, तेल हलके गरम करा. आता रात्री झोपण्यापूर्वी, नाभीत कोमट तेलाचे काही थेंब टाका. बोटांच्या मदतीने हलक्या हाताने मालिश करा आणि रात्रभर असेच राहू द्या. 

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

गावामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वर्षवास काळात पठण करा – पूज्य भंते(A) सुमेध बोधी

0
गावामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वर्षवास काळात पठण करा – पूज्य भंते(A) सुमेध बोधी


फलटण : भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रमाच्या प्रारंभी शील संपन्न,धम्मप्रचारक, अभ्यासू व लेण्यांचा अभ्यास करणाऱ्या संघराज निकाळजे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या स्तुपाच्या साक्षीने वर्षावासाचा प्रारंभ आजच्या आषाढ पौर्णिमेनिमित्त होत आहे हे त्यांच्या कुशल कर्माचे फळ आहे. त्यांच्याच सारखे प्रत्येक गावामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करावे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू संघशासन राष्ट्रीय महासचिव भंते (A)सुमेध बोधी यांनी कुरवली खुर्द येथे वर्षावास प्रवचन मालिका प्रारंभ कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले. यावेळी नालासोपारा येथून आणलेल्या धातूवर आधारित बनवण्यात आलेल्या स्तूपाचे पूजन करण्यात आले.
त्यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. भगवंताने पहिला धम्म उपदेश पंचवर्गीय भिक्खूंना केला. इ. स 528 ला संबोधी प्राप्तीनंतर भगवंतांनी पहिल्यांदा धम्माचा उपदेश केला. म्हणून या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास केला जातो.बुद्धत्व प्राप्तीनंतर ७ आठवडे भगवंताने एकांतात घालवले, आठव्या आठवड्यात गया ते सारनाथ प्रवास करून आजच्या आषाढ पौर्णिमेला त्यांचे जे प्रथम पाच शिष्य होते त्यांना प्रथम धम्मदेसना दिली आणि धर्मचक्र प्रवर्तित झाले.

ते म्हणाले, भगवंताने सांगितलेला वर्षावास हा केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता या काळामध्ये आत्म परिवर्तन, विवेक जागरणाचा काळ म्हणून आपण पहावे. या काळात धम्माचे चिंतन, मनन, अभ्यास, आत्मपरीक्षण व संयमाचे पालन करून प्रज्ञा,शील,समाधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.तुमच्या प्रति अस्सीम मंगलकामना आणि आशीर्वाद व्यक्त करतो.रोज संध्याकाळी सात ते आठ या वेळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सामुदायिक वाचन या ठिकाणी सुरू करावे.
यावेळी भंते सुमेध बोधी यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ धम्म उपासक संघराज निकाळजे यांना भेट देऊन त्यांच्या प्रति मंगल कामना व आशीर्वाद व्यक्त केले. यावेळी नालासोपारा येथे वास्तव्यास असलेले पूज्य भंते कश्यप यांनी आदर्शांचे पूजन करून सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त केली.
उपासक लक्ष्मण निकाळजे यांनी बौद्ध धम्म व आंबेडकरी चळवळीतील पुस्तकांचे दान देऊन याठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प आजच्या आषाढ पौर्णिमे दिवशी केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्याचे प्रभारी, राज्याचे संघटक, समता सैनिक दलाचे सहा.स्टाफ ऑफिसर, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य दादासाहेब भोसले, तालुकाध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, संघटक विजयकुमार जगताप, हिशोब तपासणीस सतिश कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष संपत भोसले, लक्ष्मण निकाळजे,आनंदराव निकाळजे, संघराज अहिवळे, झुंबर निकाळजे, शिलाबाई निकाळजे,सखूबाई जाधव, शाहिरा सय्यद, शारदा लोंढे, बाई जाधव, कविता जाधव, सत्यभामा जगताप, वालाबाई इंगळे, मंगला कदम, सुलोचना अहिवळे, लता अहिवळे, मोहिनी अहिवळे, उत्तम निकाळजे, फकक्ड सोनवणे, कमल अहिवळे, प्रभावती अहिवळे,निलाक्षी अहिवळे, वनिता अहिवळे, पूनम जगताप, पद्मा अहिवळे,प्रवीण इंगळे, विशाल अहिवळे, गणेश अहिवळे, पियुष अहिवले, अशोक निकाळजे, बाळासाहेब अहिवळे, राजेंद्र अहिवळे, साईबाबा अहिवळे,आबा अहिवळे, श्रीकांत अहिवळे, राजरत्न जगताप, अक्षरा जगताप, पायल जगताप, पुनम जगताप,पुर्वा जाधव, शौर्य इंगळे, स्वरा इंगळे,रुपाली इंगळे,करणं अहिवळे,सुभाष, अहिवळे , आकाश अहिवळे, अभिजित अहिवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाबासाहेब जगताप यांनी केले.

सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप न दिल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या, शेतकर्‍यावर अस्मानी संकट

0


Satara News सातारा: सातारा जिल्ह्यातील पावसाने उघडीप न दिल्याने खरीपाच्या पेरण्या होऊच शकल्या नाहीत. मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरण्यासाठी लागणारा वाफसा मिळाला नसल्याने शेतकर्‍यांना शेतात पिकच घेता आलेले नाही. यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाला असून काय करावं हे शेतकर्‍यांना समजेनासे झालं आहे. खरीपामधे भुईमुग,सोयाबीन, मका, कडधान्य आणि घेवडा पीक घेतलं जाते. मात्र ही पिके घेता न आल्याने त्याचा भविष्यात भावावर देखील परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्याचे सांगणे आहे. 

सातारा जिल्ह्यातील खरीप पेरणी हंगाम 2025-26 आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यात 40% हेक्टर क्षेत्रात खरीप हंगाम पेरणी झाली आहे. तर मागील वर्षी जुलै महिन्यातील 87% जिल्ह्यात खरीप पेरणी झाली होती. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 47% पेरणी कमी झाली आहे..

तालुका निहाय खरीप हंगाम पेरणीची आकडेवारी

सातारा तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 52 हजार 288 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 10 हजार 185 एकर झाली आहे..

जावली तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 18 हजार 914 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 1 हजार 483 एकर झाली आहे..

पाटण तालुका- सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र60 हजार 410आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 16 हजार 361  एकर झाली आहे..

कराड तालुका- सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 58 हजार 629  आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 31 हजार 178 एकर झाली आहे..

कोरेगाव तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 39 हजार 776 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 9 हजार 453 एकर झाली आहे..

खटाव तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 49 हजार 124 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 28 हजार 818 एकर झाली आहे..

माण तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 40हजार 245 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 26 हजार 609 एकर झाली आहे..

फलटण तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 32 हजार 453 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 15हजार 592 एकर झाली आहे..

खंडाळा तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 19 हजार 714 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 8 हजार 901 एकर झाली आहे..

वाई तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 20 हजार 373आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 8 हजार 194 एकर झाली आहे..

माबळेश्वर तालुका -सर्वसाधारण लागवड हेक्टर पीक क्षेत्र 4 हजार 466 आहे तर सध्या पेरणी क्षेत्र 1हजार  820 एकर झाली आहे..

एकूण जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी 3 लाख 96 हजार 392 हेक्टर क्षेत्रावर होणे अपेक्षित होते मात्र सलग पावसामुळे 1 लाख 58 हजार 595 हेक्टर वर पेरणी झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा



Source link

पावसाळ्यात ओली अंतर्वस्त्र घातल्याने होऊ शकतो ‘हा गंभीर आजार! जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

0
पावसाळ्यात ओली अंतर्वस्त्र घातल्याने होऊ शकतो ‘हा गंभीर आजार! जाणून घ्या लक्षणं आणि उपाय



Rainy Season Health Tips : पावसाळा जेवढा सुखावह असतं तेवढं काही समस्यादेखील असतात. सगळ्यात महत्त्वाची समस्या असते. पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत. अशावेळी अनेक जण ओली अंतर्वस्त्र घालतात. तुम्ही पण असे करत असाल तर आताच सावध व्हा कारण तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण देत आहात. 
 



Source link

भुवयांचे केस गळतायत? वेळीच ओळखा ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण!

0
भुवयांचे केस गळतायत? वेळीच ओळखा ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण!


Eyebrow Hair Falling: तुमच्या डोक्यावरील केस असोत किंवा भुवया गळत असतील तर हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे.
कारण तुमच्या शरीरात असे काही बदल घडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जर तुमच्या भुवयांवरील केस अचानक गळू लागले तर ते अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण ते तुमच्या शरीरात होणाऱ्या अनेक आजारांचे लक्षण असू शकते.

Add Zee News as a Preferred Source

डोक्यावरील केसांप्रमाणेच, आपल्या पापण्या आणि भुवयांवरून केस गळणे ही देखील चिंतेची बाब आहे. बऱ्याच वेळा पापण्या गळण्यामागे काही समस्या किंवा आजारदेखील असू शकतात. दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रोहित बत्रा पापण्या पडण्याच्या सामान्य कारणांबद्दल माहिती दिली आहे. ही लक्षणे वेळीच ओळखता आली तर त्यावर उपचार करणे सोपे होईल.

हायपोथायरॉईडीझम

पापण्या पडण्याचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे हायपोथायरॉईडीझम. जो तुमच्या शरीरावरील केसांच्या वाढीवर देखील परिणाम करतो. वजन वाढणे, तीव्र थकवा आणि केस गळणे यासारख्या थायरॉईडच्या गंभीर लक्षणांमध्ये हे गणले जाते.

ट्रायकोटिलोमेनिया

ज्या मुलींना भुवयांचे केस उपटण्याची सवय आहे त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. प्लकरने भुवयांचे केस उपटल्याने पापण्या गळू शकतात. पापण्या गळणे हे ट्रायकोटिलोमेनियाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. या विकाराचे कोणतेही निश्चित कारण नसले तरी असे ताणतणावामुळे केसांसह पापण्या गळू लागतात, असे म्हटले जाते.

अ‍ॅलोपेशिया अरेटा

अ‍ॅलोपेशिया अरेटामुळे अनेकांना पापण्या आणि शरीराचे केस गळण्याची समस्या असू शकते, ज्याला ऑटोइम्यून रोग म्हणतात. याला स्पॉट टक्कल पडणे असेही म्हणतात. या स्थितीत लहान ठिपक्यांमध्ये टक्कल पडणे आणि भुवया पातळ होणे यासारख्या समस्या उद्भवतात.

कुष्ठरोग

त्वचा रोग कुष्ठरोग हा एक संसर्ग आहे जो शरीराच्या अवयवांवर परिणाम करतो. त्याचा परिणाम डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर, विशेषतः भुवयांवर देखील दिसून येतो. कुष्ठरोगाने ग्रस्त लोक अनेकदा तक्रार करतात. त्यांना शरीरात कोणतीही संवेदना जाणवत नाही आणि त्यांचे केस, विशेषतः भुवयांचे केस गळू लागतात.

पोषणाचा अभाव

जर अन्नाकडे लक्ष दिले नाही तर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या भुवयांचे केसही गळू शकतात. लोह, झिंक, कॅल्शियम, बायोटिन, सेलेनियम, व्हिटॅमिन डी आणि बी12 च्या कमतरतेमुळे तुमच्या भुवयांचे केस कमी होऊ लागतात. त्याचप्रमाणे प्रथिनांचा अभाव देखील केसांच्या वाढीवर परिणाम करतो.

केमोथेरपी

केमोथेरपीच्या काही औषधांमुळे तुमचे केस कमी होऊ शकतात. डोक्यासोबतच पापण्या आणि भुवयांचे केसही गळू लागतात. केस गळणे हे इतर औषधांच्या दुष्परिणामांचे लक्षण म्हणून देखील पाहिले जाते. अशा परिस्थितीत केस पुन्हा वाढण्यास अनेक महिने लागतात.

एटोपिक त्वचारोग

एटोपिक त्वचारोग, ज्याला एक्झिमा असेही म्हणतात, हा त्वचेच्या जळजळीमुळे होणारा एक त्वचा रोग आहे. या त्वचेच्या आजारामुळे भुवयांचे केसही गळू शकतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या भुवयांमध्ये किंवा भुवयांच्या सभोवतालच्या त्वचेत लालसरपणा किंवा खाज येत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधा.

वृद्धापकाळ

वाढत्या वयानुसार केस कोरडे आणि पातळ होऊ लागतात. ज्यामुळे हळूहळू केस गळणे किंवा टक्कल पडणे होते. यासोबतच, तुमच्या भुवया देखील हलक्या दिसू लागतात.





Source link

महाराष्ट्राचं कोण आहे इथे? तरुण पुढे येऊन म्हणाला ‘मी नाशिक….’; त्यानंतर पुढे काय झालं पाहा; हरियाणातील VIDEO तुफान व्हायरल

0
महाराष्ट्राचं कोण आहे इथे? तरुण पुढे येऊन म्हणाला ‘मी नाशिक….’; त्यानंतर पुढे काय झालं पाहा; हरियाणातील VIDEO तुफान व्हायरल


Viral Video: राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्याच्या निर्णयानंतर सुरु झालेला वाद जीआर रद्द केल्यानंतर संपला असला तरी, मराठी भाषेच्या अस्मितेवरुन मात्र आता ठिकठिकाणी संघर्ष होताना दिसत आहे. एकीकडे मनसे आणि शिवसेना महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकलीच पाहिजे असं आग्रह करत असताना, दुसरीकडे मुंबईत राहणारे इतर राज्यातील नेते त्यांना आव्हान देत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरा रोडमध्ये एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर हा वाद पेटला होता. त्यानंतर मराठी माणसांनीही मनसे, शिवसेनेसह मोर्चा काढत आपली ताकद दाखवून दिली. 

एखाद्या राज्यात वास्तव्य करताना तेथील प्रांतिक भाषा शिकावी की नाही यावरुन मतांतरं असून सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होताना दिसत आहेत. मराठीसाठी सुरु असलेल्या लढ्याचं समर्थन करताना दक्षिणेतील राज्यांचं उदाहरण दिलं जात आहे. दाक्षिणात्या राज्यांनीही हिंदीची सक्ती स्विकारण्यास नकार दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान हरियाणातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. 

हा व्हायरल व्हिडीओ हरियाणाचा आहे. . या व्हिडीओत एक व्यक्ती शेतामध्ये उभी असल्याचं दिसत असून, मागे काहीजण काम करताना दिसत आहेत. यावेळी ती व्यक्ती जणू काही आपण आता मारणार आहोत अशा आवेशात टी-शर्टच्या बाह्या सरसावत ‘अरे महाराष्ट्राचं कोण आहे इथे’ अशी विचारणा करतो? यावेळी एक तरुण आपण आहोत असं सांगताच तो त्याला बोलावतो. 

थोडासा घाबरलेला तरुण जवळ आल्यानंतर तो त्याला कोणत्या गावचा आहेस असं विचारतो. त्यावर तो नाशिक असं उत्तर देतो. त्यानंतर तो त्याला हरियाणात बोल असं सांगतो. तरुण येत नाही म्हटल्यावर ‘मग इथे कसा आलास? इथे कसा काय काम करतोस?’  असा प्रश्न विचारतो. हे प्रश्न ऐकल्यावर तरुणाला काय करावं सुचत नाही. त्याच्या हालचालींवरुन तो प्रचंड घाबरलेला दिसत आहे. 

यानतंर ती व्यक्ती हसत ‘तुझा देश आहे, तू नाही तर कोण काम करणार’ असं हसत म्हणतो आणि मिठी मारतो. तुझा भारत देश आहे, जी मर्जी असे ते कर असं सांगत ती व्यक्ती तेथून जाते. 

@notthatmanusharma या इंस्टाग्राम अकाऊंटला हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी कमेंट्स करत आहेत.





Source link

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुकास्तरीय महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुकास्तरीय महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी दि. 11 जुलै रोजी बैठक

फलटण – येत्या शुक्रवार, दिनांक 11 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुकास्तरीय एक महत्वपूर्ण बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. अशोकराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या बैठकीत आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच साखरवाडी येथील शासकीय जागेवर बुद्ध विहार स्थापनेसाठीची पुढील रणनीती, आणि आयत्या वेळेस उद्भवणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहेत.

या बैठकीसाठी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यामध्ये:
🔹 श्री. प्रमोद काकडे (मुंबई प्रदेश संघटक)
🔹 श्री. विजय येवले (जिल्हा सचिव, सातारा)
🔹 श्री. संजय निकाळजे (जिल्हा सदस्य, सातारा)
🔹 श्री. मधुकर काकडे (पश्चिम महाराष्ट्र संघटक)
🔹 श्री. राजू मारुडा (जिल्हा उपाध्यक्ष, सातारा)

तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीसाठी फलटण तालुका व शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, तसेच महिला आघाडी प्रमुख विमलताई काकडे व सारिका अहिवळे यांनी केले आहे.

पायात दिसतील Silent Killer ची ६ लक्षणे, लोकांना वाटतं हा थकवा पण …

0
पायात दिसतील Silent Killer ची ६ लक्षणे, लोकांना वाटतं हा थकवा पण …


शरीरात सतत बदल होत असतात. अनेकदा आपल्याला होणार आजार हा सुरुवातीला लक्षणांमार्फत दिसत असतो. पण आपण अशा लक्षणांकडे सामान्यबाब म्हणून दुर्लक्ष करतो. शरीरातील जवळजवळ सर्व नसा पाय आणि तळव्यामध्ये एकत्र येतात. त्यामुळे, जर कोणत्याही अवयवात काही समस्या असेल तर त्यामुळे पायांमध्ये सिग्नल देत असतात. या 6 लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. 

Add Zee News as a Preferred Source

सायलेंट किलर्सची लक्षणे

असे अनेक आजार आहेत ज्याची लक्षणे अतिशय सामान्य असतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट अतिशय सामान्य वाटतात.सामान्या लक्षणांमध्ये थकवा किंवा तणाव असतो. या आजारांना सायलेंट किलर्स म्हणतात. ज्यामध्ये यकृत आणि हृदयाच्या समस्या सामान्य आहेत. या 6 लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. डॉक्टरकडे जाऊनच तुम्ही त्यांचे उपचार घेऊ शकाल.

पायांमधील लक्षणे

जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये खाज सुटणे किंवा जळजळ होण्याची समस्या होत असेल कर दुर्लक्ष करु नका. लिव्हर फाउंडेशनच्या मते, जेव्हा यकृत योग्यरित्या काम करू शकत नाही, तेव्हा शरीरात पित्त क्षार वाढू लागतो. ज्यामुळे त्वचेमध्ये असलेल्या नसा प्रभावित होऊ शकतात आणि खाज येऊ शकते.

पायात पेटके
मॅग्नेशियम हे शरीरातील चौथे सर्वात महत्वाचे खनिज मानले जाते. ते शरीरातील ३०० हून अधिक जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये सहभागी आहे. ते स्नायूंच्या आकुंचन आणि मज्जातंतूंच्या संक्रमणास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे पायांमध्ये कडकपणा आणि कडकपणा येऊ शकतो.

तळव्यांना सूज
हृदयाच्या समस्यांमुळे पायाच्या खालच्या भागात सूज येऊ शकते. जेव्हा हृदयाचे कार्य मंदावते तेव्हा खालच्या भागात रक्तपुरवठा योग्य होत नाही. यामुळे येथे पाणी साचू लागते आणि सूज येऊ शकते. ही समस्या यकृताच्या नुकसानीमुळे देखील उद्भवते.

टाचदुखी
मॅग्नेशियम तुम्हाला प्लांटर फॅसिटायटिस आणि तळव्यांच्या समस्या टाळण्यास मदत करते. जर याची कमतरता असेल तर चालताना किंवा जमिनीवर ठेवताना तुम्हाला टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. जर हे बऱ्याच काळापासून होत असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तळव्याच्या रंगात बदल
जेव्हा हृदय रक्त योग्यरित्या पंप करत नाही, तेव्हा पायातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. ऑक्सिजन आणि पोषणाच्या कमतरतेमुळे, तुमच्या तळव्याचा रंग जांभळा होऊ शकतो. विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे देखील त्याचा रंग बदलू शकतो, जे यकृत निकामी होण्याचे लक्षण आहे.

पायामध्ये मुंग्या येणे
जर तुम्हाला पायात मुंग्या येणे किंवा बधीरपणा येत असेल, तर एकदा व्हिटॅमिन बी १२ चाचणी करून घ्या. नसांचे आरोग्य राखण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यामुळे नसा कमकुवत होतात आणि मुंग्या येणे होऊ शकते.





Source link

प्रेमाच्या आड आलेला जीवः शिवथरमध्ये विवाहितेची घरातच गळा चिरून हत्या; आरोपी अवघ्या १२ तासांत जेरबंद

0
प्रेमाच्या आड आलेला जीवः शिवथरमध्ये विवाहितेची घरातच गळा चिरून हत्या; आरोपी अवघ्या १२ तासांत जेरबंद

सातारा, ९ जुलै (साहस Times) – साताऱ्यातील शिवथर गावात प्रेमप्रकरणातून एका विवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा जाधव (वय ३०) या महिलेचा तिच्या राहत्या घरात खून करण्यात आला. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या बारा तासांत आरोपी अक्षय रामचंद्र साबळे याला पुण्यातून अटक केली असून, चौकशीत त्याने हे कृत्य प्रेमसंबंधातून केल्याची कबुली दिली आहे.

घटना सोमवारी (८ जुलै) शिवथर येथील गुजाबा वस्तीवर घडली. त्या दिवशी पूजाचे सासू-सासरे शेतावर गेले होते, तर पती प्रथमेश जाधव साताऱ्यातील आनंद ट्रॅव्हर्समध्ये नोकरीवर गेला होता. सात वर्षांचा मुलगा शाळेत, आणि भाऊ पुण्यात असल्याने पूजा घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

दुपारी घराचे दरवाजे उघडे असल्यामुळे शेजारील वृद्ध महिला घरात गेली असता, तिला पूजाचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.

सातारा तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेतला आणि तो पुण्यातून रात्री उशिरा गजाआड करण्यात आला. आरोपीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.