फलटण, दि. ४ जुलै – संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामांची शहरात जोरदार चर्चा आहे. पालखीच्या आगमनाआधीच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणे तसेच पालखी संपल्यानंतर अवघ्या काही तासांत शहर पुन्हा स्वच्छ व सुशोभित करणे यामुळे निखिल मोरे यांचे कार्य शहरवासीयांच्या मनात ठसले आहे.
फलटणमधील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या कामगिरीबद्दल मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी अमीरभाई शेख, निलेश तेलखडे, ज्ञानेश्वर पवार, राजाभाऊ देशमाने, राहुल शहा, निखिल उपाध्याय, दीपक करवा, मेहबूबभाई मेटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी मोरे यांच्या कार्यतत्परतेचे विशेषतः तेवढेच कौतुक करण्यात येते की, अतिवृष्टीमुळे मोडकळीस आलेले पूल, रस्त्यांवरील खड्डे, आणि शहरातील साचलेली घाण – या सर्व समस्यांना त्यांनी प्राधान्य देत तातडीने उपाययोजना केल्या.