Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशPondicherry University Controversy | पाँडेचेरी विद्यापीठ कार्यक्रमात रामायणावरुन वाद, सीतेनं रावणाला गोमांस...

Pondicherry University Controversy | पाँडेचेरी विद्यापीठ कार्यक्रमात रामायणावरुन वाद, सीतेनं रावणाला गोमांस अर्पण करताना दाखवलं, एबीवीपी केला निषेश! | Navarashtra (नवराष्ट्र)

Pondicherry University Controversy | पाँडेचेरी विद्यापीठ कार्यक्रमात रामायणावरुन वाद, सीतेनं रावणाला गोमांस अर्पण करताना दाखवलं, एबीवीपी केला निषेश! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

देवी सीता आणि भगवान हनुमान यांसारख्या हिंदू देवतांचा अपमान करणे कोणत्याही परिस्थितीत माफ करता येणार नाही, असे म्हणत अभाविपने नाटकाच्या आशयावर आक्षेप व्यक्त केला.

पाँडिचेरी विद्यापीठातील वार्षित सांस्कृतिक महोत्सवादरम्यान  (Pondicherry University Controversy) विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रामयण नाटकावरुन नवा वाद सुरू झाला आहे. सोमयानम नावाच्या नाटकात रामायणातील पात्रांचं विकृत आणि अपमानास्पद चित्रण करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP) केला आहे. त्यांनी या नाटकाचा निषेध करत नाटकाच्या दिग्दर्शकासह अन्य जबाबदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका प्रकार काय 

पाँडिचेरी विद्यापीठात नुकतचं वार्षित सांस्कृतिक महोत्सवाचं (इझिनी 2K24) आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटकाचं सादरिकरण केलं. यावेळी नाटकात सीतेला रावणाला गोमांस अर्पण करताना दाखवण्यात आले आणि हनुमानजींच्या चरित्राचा विपर्यास करण्यात आला, असा आरोप एबीवीपीने केला. नाटकात अग्निपरीक्षेलाही सीतेच्या अपहरणाचे चुकीचे चित्रण करून अपमानित करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. यावरुन कॅम्पस परिसरात एकच खळबळ उडाली असुन,  एबीवीपीनं या घटनेचा निषेश केला आहे. देवी सीता आणि भगवान हनुमान यांसारख्या हिंदू देवतांचा अपमान करणं कोणत्याही परिस्थितीत माफ करता येणार नाही, असे म्हणत भाजपची विद्यार्थी संघटना ABVP ने नाटकाच्या आशयावर आक्षेप घेतला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments